नवी मुंबई

तिसऱ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; बांधकाम ठेकेदारावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

या घटनेतील मृत तरुणाला तेथील ठेकेदाराने सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेले साहित्य न पुरविल्यामुळे सदरची दुर्घटना घडल्याचे आढळून आले

Swapnil S

नवी मुंबई : तिसऱ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना नवी मुंबईत घडली आहे. पनवेल तालुक्यातील नेवाळी गाव येथे नवीन इमारतीच्या बांधकाम साइटवर सेंट्रींगचे काम करणाऱ्या विपीन रामचंद्र कुमार (२०) या तरुणाचा सदर इमारतीच्या तिसऱया मजल्यावरून खाली पडुन मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील मृत तरुणाला तेथील ठेकेदाराने सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेले साहित्य न पुरविल्यामुळे सदरची दुर्घटना घडल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे खांदेश्वर पोलिसांनी ठेकेदाराला जबाबदार धरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ठेकेदाराचे नाव अमित वर्मा असे आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी विपीन कुमार व गोरख कुमार या दोघांना पनवेल तालुक्यातील नेवाळी गाव येथे सेंट्रींगचे काम करण्यासाठी बोलावून घेतले होते. मागील ३ महिन्यांपासून हे कामगार नेवाळी येथील केदारनाथ या नवीन बिल्डिंगचे काम करत होते. गत २१ फेब्रुवारी रोजी विपीन व गोरख हे दोघे तिसऱ्या मजल्यावरील सेंट्रींगचे लावलेले फ्लाय काढण्याचे काम करत होते. यादरम्यान सायंकाळच्या सुमारास विपीन याचा पाय घसरल्याने तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. यात विपीन गंभीर जखमी झाल्याने त्याला एमजीएम हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले; मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत झाल्याचे सांगितले.

रेवडी संस्कृतीवर ताशेरे; राज्य तोट्यात, तरीही खिरापत का वाटता? रोजगार निर्मितीवर भर द्या! सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारांना फटकारले

‘डीपफेक’ रोखण्यासाठी AI कंटेंटवर लेबल असावे; पंतप्रधान मोदी यांचे मत

Mumbai : सव्वा वर्षांनंतर एकनाथ शिंदेंचा महापौर? मुंबई महापालिकेतील सत्ता समीकरण बदलणार; महायुतीत एकमत झाल्याची चर्चा

किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा; राज्यभर शिवजयंती उत्साहात साजरी, मुख्यमंत्री-दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून शिवरायांना मानवंदना

आजचे राशिभविष्य, २० फेब्रुवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत