नवी मुंबई

यशश्री शिंदे हत्याप्रकरणी उरणकरांचा आक्रोश; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार, आरोपी अजूनही फरार

यशश्री शिंदे या तरुणीच्या निर्घृण हत्येनंतर उरण तालुक्यात संतापाचे वातावरण पसरले आहे.

Swapnil S

उरण : उरणमधील यशश्री शिंदे या तरुणीच्या निर्घृण हत्येनंतर उरण तालुक्यात संतापाचे वातावरण पसरले आहे. जोपर्यंत आरोपीला पकडत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही, अशी भूमिका घेतलेल्या नागरिकांची पोलीस आणि यशश्री शिंदे यांच्या कुटुंबीयांनी समजूत काढल्यानंतर अखेर शोकाकुल वातावरणात प्रचंड लोकांच्या उपस्थित अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी यशश्रीच्या हत्येचा निषेध म्हणून उरणमधील सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळून हा मोर्चा काढण्यात आला होता.

उरण शहरातील एन आय स्कूलच्या जवळील घरात राहाणाऱ्या यशश्री शिंदे या २२ वर्षाच्या मुलीची कोटनाका पेट्रोल पंपाजवळ नेऊन तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. सदर मूलीच्या हत्येची माहिती शनिवारी ( दि२७ ) पहाटेच्या सुमारास उरण पोलीसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला. यशश्री शिंदे हिच्या हत्येची घटना समजल्यानंतर शनिवारी उरणमधील बाजारपेठ उत्स्फूर्तपणे बंद करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी देखील हत्येचा निषेध म्हणून उरण बाजारपेठ बंद करण्याचा आणि निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार रविवारी सकाळी १० वाजता मोर्चा काढण्यात आला होता.

हा संतप्त मोर्चा उरण पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर आक्रमक झाला आणि जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत येथेच ठाण मांडण्याचा निर्धार केला. पोलीस आणि राजकीय पुढाऱ्यांनी अखेर संतप्त नागरिकांची समजूत काढून दोन दिवसात आरोपीला पकडण्याचे आश्वासन दिल्यानंतर अखेर संतप्त नागरिक आपल्या घरी गेले.

आरोपीला पकडण्यात अडचणी

हत्या करणारा आरोपी दाऊद शेख हाच असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र सध्या हा आरोपी फरार असून त्याने आपल्याजवळील दोन्ही मोबाईल नंबर बंद करून ठेवल्याने त्याला पकडण्यात अडचणी येत आहेत. पोलीस आपल्यापरिने तपास करत असून आरोपीला जास्तीत जास्त कडक शासन होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम