FP photo
संपादकीय

धर्माची कृतिशील चिकित्सा

प्रत्येक नागरिकाच्या धर्मउपासनेच्या घटनादत्त स्वातंत्र्याचा आदर करून धर्माच्या नावावर होणाऱ्या फसवणुकीच्या विरोधात समिती काम करते. आपल्या उपासनेमुळे जर सामाजिक संपत्ती असलेला पाण्याचा साठा प्रदूषित होत असेल अथवा ध्वनिप्रदूषण होत असेल, तर ती उपासना पद्धत बदलायलाच हवी.

नवशक्ती Web Desk

भ्रम-विभ्रम

- प्रभा पुरोहित

प्रत्येक नागरिकाच्या धर्मउपासनेच्या घटनादत्त स्वातंत्र्याचा आदर करून धर्माच्या नावावर होणाऱ्या फसवणुकीच्या विरोधात समिती काम करते. आपल्या उपासनेमुळे जर सामाजिक संपत्ती असलेला पाण्याचा साठा प्रदूषित होत असेल अथवा ध्वनिप्रदूषण होत असेल, तर ती उपासना पद्धत बदलायलाच हवी. या दृष्टिकोनातून अंनिस 'विसर्जित गणपती दान करा', अशा विविध मोहिमा राबवित आहे.

देव आणि धर्म हा समाजातील अति संवेदनाशील विषय आहे. मानवी इतिहासातील सर्वात प्राचीन समाज-संघटन म्हणजे धर्म होय. कमी-अधिक प्रमाणात सर्वच धर्मांनी स्वर्ग, नरक, प्रारब्ध, पूर्वसंचित, जगन्नियंता या कपोलकल्पित गोष्टींना थारा दिला. त्याची परिणती जारण- मारण, ज्योतिष, नवग्रह शांती, यज्ञयाग, बळी चढविणे अशा अनेक घातक रूढी आणि अंधश्रद्धा निर्माण होण्यात झाली. त्यातील शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना समिती विरोध करते. कर्मकांडे हा मानवी संस्कृतीचा भाग आहे. माणसाच्या एकमेकांतील संवादाचा आणि उपजत कृतज्ञभावाचा तो एक आविष्कार आहे. जोवर त्यामुळे सामाजिक नीतिमूल्यांना धक्का पोहचत नाही, कुणाचे शोषण होत नाही तोवर समिती त्याची दखल घेत नाही. परंतु जेव्हा एखाद्याचे धर्मपालन कायदा आणि सुव्यवस्था, राष्ट्रीय एकात्मता, सार्वजनिक आरोग्य व नीतिमूल्ये यांच्या आड येत असेल, तेव्हा अशा धर्माचे नियंत्रण करण्याचा हक्क घटनेने राज्यसत्तेला देऊ केला आहे. या दृष्टिकोनातून धर्माची विधायक कृतिशील चिकित्सा समिती करते.

धर्माच्या आधारे नैतिक आचरण करणाऱ्या व्यक्तीचा समिती आदर करते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची एक सुटसुटीत व्याख्या डॉ. दाभोलकर उद्धृत करीत असत. 'माणसाचा मूल्यविवेक उन्नत करते ती श्रद्धा आणि मूल्यविवेक अवनत करते ती अंधश्रद्धा.' अशी धर्माची विधायक चिकित्सा करणे हे अंनिसच्या चळवळीचे एक महत्त्वाचे सूत्र आहे. कालबाह्य, अनिष्ट, जाचक अथवा पर्यावरणघातक धर्मप्रथांमध्ये समुचित बदल सुचविणे किंवा त्या बंद करणे हे त्यात मोडते. येथे समाजाला समजेल, रुचेल अशा भाषेत सहानुभूतीने आणि हेटाळणी टाळून संवाद साधणे आवश्यक ठरते. प्रत्येक नागरिकाच्या धर्मउपासनेच्या घटनादत्त स्वातंत्र्याचा आदर करून धर्माच्या नावावर होणाऱ्या

फसवणुकीच्या विरोधात समिती काम करते. आपल्या उपासनेमुळे जर सामाजिक संपत्ती असलेला पाण्याचा साठा प्रदूषित होत असेल अथवा ध्वनिप्रदूषण होत असेल, तर ती उपासना पद्धत बदलायलाच हवी. या दृष्टिकोनातून अंनिसने 'विसर्जित गणपती दान करा', 'होळी लहान पोळी दान', 'फटाकेमुक्त दिवाळी' अशा विविध मोहिमा राबविल्या, या उपक्रमांना जागोजागी समितीला जनतेचा, प्रसार माध्यमांचा आणि नोकरशाहीचाही उत्तम प्रतिसाद मिळाला. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अंनिसची 'पर्यावरणपूरक गणेशोत्सव' ही मोहीम.

नाशिक, पुणे, कोल्हापूरसारख्या मोठ्या शहरातून जेथे जेथे गणेश विसर्जनाने मोठ्या प्रमाणावर नद्या दूषित होण्याचा धोका असतो, तेथे अंनिस कार्यकर्त्यांनी सनातन्यांच्या विरोधाला तोंड देत ही मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविली. पाणी प्रदूषण टाळण्यासाठी विसर्जित मूर्ती गोळा करून त्या पडिक खाणीत वा अन्य जागी गोळा सुरुवातीला 'विसर्जित मूर्ती दान करा' हे कार्यकर्त्यांचे आवाहन म्हणून काही सनातनी थाळ्यांचा करीत. परंतु इतकी वर्षे चळवळ आता मोठी जनजागृती झाली निर्माल्य पाण्यात टाकल्याने पाणी शुद्ध आमच्या धर्माचा प्रश्न आहे.' असे संघटनाच आता निर्माल्यापासून बनविण्यासाठी सरसावल्या नगरपालिका स्वतःहून विसर्जनासाठी आहेत. अलीकडे तर केंद्रातील आणि हवामान बदल मार्गदर्शक तत्त्वे सांगणारी अर्धा एखाद्या केल्या जात. आम्हाला ऐकू येऊ नये ठणठणाट केल्यानंतर आहे. ' होते. हा म्हणणाऱ्या जैविक खत आहेत. हौद बांधत पर्यावरण, वन खात्याच्या राज्यमंत्र्याने गणेशमूर्ती विसर्जनासाठी पानभर, जनहितार्थ जाहिरात प्रमुख वृत्तपत्रातून दिली होती. "आता या मोहिमेची गरज संपली. आपण त्यातून 'रिटायर' व्हायला हरकत नाही," असे डॉ. दाभोलकरांनी सांगितले. याबाबत एक गमतीची गोष्ट म्हणजे डॉ. दाभोलकरांनी आपले मित्र न्या. जहागीरदार यांच्या संस्कृत प्रवीण, सुविद्य पत्नीच्या मदतीने गणेश मूर्ती पार्थिवाची (शाडूची) हवी, लहान हवी या विषयी संस्कृत धर्मग्रंथातून काही शास्त्राधार मिळतो का, हे शोधण्याचा प्रयत्न केला. श्रीगणेशाची मूर्ती वाहत्या पाण्यात 'निर्गत करू नका' असे ते म्हणत, 'टाकू नका' असे अवमानकारक शब्द डॉ. दाभोलकरांनी कटाक्षाने टाळले. लोकांच्या धर्मभावनांचा आदर करण्याकडे त्यांची प्रवृत्ती होती. लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवधर्माबाबत चुकूनही अवमानात्मक शब्द वापरणे समितीच्या ध्येयधोरणात बसत नाही. गणेश बुद्धीची देवता आहे तेव्हा गणेशोत्सवासाठी जमलेल्या पैशातील कमीत कमी २% रक्कम जवळच्या शाळेसाठी वा शैक्षणिक कार्यासाठी वापरावी असे खास कळकळीचे आवाहन ते करीत. आता सरकारी जाहिरातीत सजावटीसाठी वापरलेली कापडे जाळू नका, अनाथालयासाठी वापरा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही धर्माची सृजनशील आणि परिवर्तनशील शक्ती आंदोलनकर्त्यांनी ओळखायला हवी.

संत आणि समाजसुधारकांचा वारसा पुढे नेणे हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पंचसूत्रीमधील एक महत्त्वाचे सूत्र आहे. आम्ही मांडत असलेला विचार हा खरे तर आपल्या संत आणि समाजसुधारकांचा वारसा आहे हे दाखवून दिले की, होणाऱ्या विरोधाची धार थोडी बोथट होते. महाराष्ट्राला साधुसंतांची आणि समाजसुधारकांची थोर परंपरा लाभली आहे. त्यांनी समाज परिवर्तनाची वाट दाखवली. संत तुकाराम, सोयराबाई आणि अगदी अलीकडे गाडगेबाबा यांनी धर्माची नीती मूल्यात्मक बाजू उचलून धरली. निरर्थक कर्मकांडाची यथेच्छ टिंगलटवाळी केली. "नवसायासे पुत्र होती, तरी का करणे लागे पती?", "पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा". अशा संतवचनांनी जनसामान्यांचे प्रबोधन केले. अंधश्रद्धा निर्मूलन समिती केवळ हिंदूंच्याच धर्मप्रथांबाबत आणि बाबा- बुवांच्या विरोधात बोलते, असा निराधार आरोप बऱ्याच वेळा केला जातो. बुलढाणा येथील सैलानीबाबा दर्गातील मनोरुग्णांसाठी तसेच वसई येथील सायमन मार्टिन बाबाच्या विरोधात अंनिसने यशस्वी लढे दिले आहेत. मदर तेरेसाला संतपद बहाल करण्यासाठी चमत्कारांची आवश्यकता नाही, यासंबंधी अंनिसची आग्रही भूमिका होती. समिती आपल्या व्यासपीठावर कुठलेही धार्मिक कर्मकांड करीत नाही वा अन्यत्र त्यात सहभागी होत नाही. भारतीय घटनेने प्रत्येकाला धर्मपालनाचे व उपासनेचे स्वातंत्र्य दिले आहे. तसेच देवधर्म न मानण्याचे स्वातंत्र्य पण दिले आहे. परंतु धर्म आणि देव नाकारणे ही समितीचे सभासद होण्यासाठीची पूर्वअट नाही.

संत आणि समाजसुधारकांचा आदर्श घेऊन बुवाबाजी, अंधश्रद्धा व त्यातून येणारी निष्क्रियता घालविण्यासाठी जनचळवळीचा प्रचंड रेटा निर्माण करण्याची आज निकड आहे. हे समजून घेणे आवश्यक आहे की, धर्माचा आणि धर्माशी निगडित अंधश्रद्धांचा इतिहास पाच हजार वर्षे जुना आहे, तर विवेकाचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार फक्त गेली पाच-सहाशे वर्षेच सलगपणे मांडला जात आहे. हा इतका जुना आजार सहजासहजी बरा होण्यातला नाही. इथे शतकांचा विचार करायला हवा आणि आपले समाज प्रबोधनाचे काम न डगमगता चालू ठेवायला हवे. प्रत्येक विचार करणाऱ्या माणसाने अशा चळवळीत सामिल होणे गरजेचे आहे. खऱ्या धर्म शिकवणुकीचे सोयरसुतक नसलेली मंडळी संघटितपणे धर्माला हिंसक, आक्रमक आणि कर्मकांडांचे रूप देऊन धार्मिक उन्माद निर्माण करीत आहेत. अशावेळी धर्माच्या सकारात्मक बाजूला आवाहन करून जनजागृती करणे आवश्यक आहे. हा जगन्नाथाचा रथ आहे. सर्वांनी ओढावा.

(लेखिका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आहेत.)

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी