वातावरणातील बदल घातक ठरणार 
संपादकीय

वातावरणातील बदल घातक ठरणार

एल-निनोच्या प्रभावामुळे राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. पण शेतकरी हा हवालदील झालेला आहे त्याला नैराश्याच्या गर्तेतून काढण्यासाठी २०१६-१७ मध्ये राबवलेला प्रेरणा प्रकल्प राबविणे गरजेचे आहे.

नवशक्ती Web Desk

विशेष

डॅा दीपक रा. सावंत

एल-निनोच्या प्रभावामुळे राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. पण शेतकरी हा हवालदील झालेला आहे त्याला नैराश्याच्या गर्तेतून काढण्यासाठी २०१६-१७ मध्ये राबवलेला प्रेरणा प्रकल्प राबविणे गरजेचे आहे.

क्लायमेट चेंजमुळे वातावरणातील अनेक स्थित्यंतराबरोबर एल-निनोचे संकट जगावर घोंघावत आहे. हा बदल शोधून काढणारे कोळी आहेत. त्यांना कळलेला हा पाण्याच्या तापमानात होणारा बदल, वाढलेले पाण्याचे तापमान त्यांच्या मासेमारीला अडचणीचे ठरायचे. एल-निनो म्हणजे Christ child छोटे बाळ. पेरू या देशाच्या समुद्रात दर डिसेंबर महिन्यात पाण्याच्या तापमान बदल व्हायचा. हा बदल हवामान शास्त्र व समुद्र शास्त्राप्रमाणे वातावरणातील बदलामुळे विषुववृत्तीय भागातील प्रशांत महासागरातील समुद्राच्या पाण्याच्या तापमानात वाढ झालेली. ही ऐन डिसेंबर महिन्यात होते, दक्षिण अमेरिकेवरही या विषुववृत्तीय भागाच्या विपरीत तापमान वाढीचा परिणाम दिसतो, याचा परिणाम चिलीमधील शेती मासेमारीवरही दिसून येतो. याचा दूरगामी परिणाम दक्षिण आशिया भागातील देशांवर दिसून येतो. हे सतत कमी जास्त होणारे तापमान ओशनिक निनो इंडेक्सद्वारे मोजले जाते. ONI यामुळे लंबकाप्रमाणे सतत ऑसिलेशन करत राहणारे तापमान ही हवामान शास्त्रासाठी डोकेदुखी असते.

सध्याचा एल-निनोचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणात वातावरणातील बदल घडवून आणत आहे. याची सुरुवात जून २०२६ पासूनच झाली आहे. हा क्लायमेट चेंजचा प्रभाव हा जागतिक स्तरावर मोठी हानी होणार आहे. University of Chicago व क्लायमेट इम्पॅक्ट लॅब (Climate Impact Lab) च्या रिपोर्टनुसार जगात ४ लाख ५१ हजार लोक मृत्युमुखी पडू शकतात.

यापैकी ६०००हून अधिक लोक नेपाळ दुर्घटनेत बेपत्ता आहेत. कदाचित सर्वच मृत्युमुखी पडले असतील, असे सध्यातरी शव मिळालेले नसल्याने म्हणणे योग्य होणार नाही. मात्र शोध सुरू आहे असेच म्हणता येईल. यापैकी नायजेरिया सुदान याचबरोबर निगर, चाड, या साऊथ ईस्ट आशियातील देशात जास्त बळी जातील, असे म्हटले आहे. फिलिपाइन्सच्या व्हिएतनाम कंबोडिया थायलंड येथे ही ॲव्हरेज डेथ टोलपेक्षा जास्तीचे बळी जाणार, असे म्हणणे आहे. तसेच इंडोनेशियात अंदाजे १९३० अधिकचे मृत्यू होणार आहेत. भारतातही १५००हून अधिकचे मृत्यू होतील, असे क्लायमेट इम्पॅक्ट लॅब यांच्या अहवालात नमूद केले आहे. विशेषत: पृथ्वीवर साऊथ ग्लोब हा या एल- निनोच्या प्रभावाचा बळी ठरेल. १३० हून अधिक देशात मृत्यू वाढतील पाण्याचे, अन्नाचे दुर्भिक्ष्य, वादळे याला या भागाला सामोरे जावे लागेल. यात जास्तीत जास्त बळी तापमानात होणाऱ्या वाढीमुळे आहेत, समुद्र तापमान वाढीबरोबरच Global Land temperature 1.2 degrees Celsius ने वाढलेले असेल ही सर्व तापमान वाढ जून २०२६ पासून सुरू आहे. ती फेब्रुवारी-मार्च २०२७ पर्यंत राहील, असे म्हटले आहे. जागतिक स्तरावर याची नोंद घेतली गेली आहे

महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भातील जनता दुष्काळी परिस्थितीत होरपळत आहे. देशातील परिस्थिती ही तशीच आहे. गेल्या २० वर्षांत जगात इतकी तापमानवाढ कधीच झाली नव्हती. या जून ते फेब्रुवारी या कालावधीतील ४४% दिवस हे सर्वाधिक उष्ण असतील. त्यामुळे हिट स्ट्रोकमुळे जास्त लोक मृत्युमुखी पडतील तसेच उष्णता वाढल्याने पाण्याची पातळी कमी होईल. वाॅटर टेबल खाली जाईल. नदी, नाले, तलाव इतर पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटून जातील, त्यामुळे वाॅटर टेबल खाली जाईल. पावसाळा संपत आला तरी महाराष्ट्रात फक्त किनारपट्टीच्या भागात थोडाफार पाऊस झाला. पण भातशेती ही धोक्यात आहे. कदाचित रिसर्चरच्या म्हणण्यानुसार, जलजन्य आजार वाढतील. दूषित पाणी व क्षारयुक्त पाणी प्यायल्याने डायरिया, काॅलरा, अमिबायासिस, कोलन कॅन्सरसारखे आजार मृत्यूच्या आकडेवारीत भर घालू शकतात. किडनी विकार क्षारयुक्त पाणी प्यायल्याने बळावतील. असे म्हणण्याला शास्त्रीय आधारही आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीची क्षमता कमी होणे. पाऊस न पडल्याने त्या जमिनीचा आम्लयुक्तपणा दिवसेंदिवस वाढत आहे. जमिनीचा pH यापूर्वी पीक वाढवण्यासाठी वापरलेली सिथेंटिक नायट्रोजनयुक्त खते ही जमिनीतील दर्जेदार यील्ड देण्यासाठी अकार्यक्षम झाली आहेत. पिकाचा दर्जा ढासळेल अशी ही सूचना कृषी तज्ज्ञांना क्लायमेट चेंज रिसर्चरनी दिली आहे. यातून पुन्हा एकदा सिद्ध होईल की पिकलेल्या किंवा पिकवलेल्या धान्यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, मिनरल्स नाहीत. त्यामुळे वाढ खुंटेल, लहान मुलांना इन्फेक्शन होतील, कुपोषणही वाढेल, कॅन्सरसारखे आजार वाढतील.

शासनाने जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनाखाली या परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी वेळ न दवडता आराखडा बनवावा. हिट स्ट्रोक क्लिनिक्स ग्रामीण भागात शहरी भागात तयार करावी लागतील. या सर्वांची पार्श्वभूमी क्लायमेट चेंजमुळे होणारा एल-निनोचा उत्पात आहे.

याबरोबरच आणखी उत्पात होत आहे ते म्हणजे ओझोनच्या आवरणचे होणारे डिप्लेशन व पोलर व्होर्टेक्स (ध्रुवीय भोवरा) याचा जवळचा संबंध आहे. या ओझोनच्या आवरणाला असलेले छिद्र मोठे झाल्याने हा ध्रुवीय भोवरा तयार होण्यासाठी हिवाळ्यात पोलवर अति थंडी विशेषत: अंटार्क्टिका म्हणजेच साऊथ पोलवर असलेली तीव्र थंडी आणि थंड वारे त्यातून तिथे सूर्यप्रकाश नसल्याने थंडीची तीव्रता वाढते. हे वारे नॅार्थ पोल व साऊथ पोल चक्राकार वेगाने फिरतात. ते १० ते ३० मैल प्रतितास या वेगाने फिरतात. यामध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन ओझोन आवरण कमकुवत होऊन छिद्र पडते. यामुळे वातावरणात अनेक बदल होतात. सध्या जे बर्फ वितळणे हे तापमान वाढल्यामुळे झपाट्याने होत आहे व सध्या बर्फ पडण्याचे प्रमाण (ICEFALLS) जे कमी झाले आहे त्याला पोलर व्होर्टेक्स ओझोन आवरणाला पोहोचलेली हानी जबाबदार आहे. बर्फबारीऐवजी पाऊस पडलेला दिसतो. १९३९ ते २०२४ या कालावधीत ४८ राज्यात snow fall कमी झालेला दिसतो. ओझोन आवरण जे शरीराला घातक आहे ते या कमजोर क्षीण झालेल्या आवरणातून पृथ्वीवर येऊन माणसाला त्वचाविकार, डोळ्यांचे आजार, कॅटरॅट अंधत्व, यूव्ही रेंजमुळे कॅन्सरसारखा आजार देतात. झाडाच्या वाढीवरही परिणाम करतात. त्यामुळे नजीकच्या काळात मोठे होणारे छिद्र हे जगातील आजारपण व मृत्यू वाढवतील, याचबरोबर टीबीसारख्या संसर्गजन्य आजाराच्या दृष्टीने एल- निनो अतिशय वाईट परिणाम घडवेल. आर्द्रता ६७% ते ८७% पर्यंत जाईल. त्या टीबीचा संसर्ग हा वेगात होईल. एल-निनोच्या प्रभावामुळे तापमानातील चढ -उतारामुळे टीबीच्या केसेस वाढतील, (science Direct) हेही महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेने लक्षात घ्यावे. त्याचबरेबर डेंग्यू, मलेरिया या आजारांनाही एल-निनो व तापमान बदल निमंत्रण देईल. आपल्या सर्वांच्या मनात एक प्रश्न येतो की १२००० किमी दूर असलेल्या भारताला याचा फटका कसा बसतो. ज्यावेळी विषुववृत्तीय भागातील तापमान वाढते तेव्हा साहजिकच ट्रेड विंड्स हे उत्तरेकडे सरकतात. ओझोन आवरण पूर्वपदावर आणण्यासाठी माॅन्ट्रियल येथे झालेल्या क्लायमेट चेंजच्या सभेत अनेक मुद्दे उपस्थित झाले. क्लोरीन ब्रोमिन तसेच हॅड्रोफ्ल्युरो कार्बन नायट्रस ऑक्साईड वायू उत्सर्जित करणारे किंवा तत्सम संयुगे हवेत सोडणारे केमिकल व इतर कारखान्यावर बंदी आणली. २०६० पर्यंत ओझेन लेयर पूर्ववत होईल. असा विश्वास व्यक्त करतात, पण सध्या ओझोन लेयरचे छिद्र मोठे होत आहे. यामुळे संशोधक, हवामानतज्ज्ञ चिंतित आहेत.

या काळात म्हणजेच एल-निनोमुळे पाऊस बेभरवशाचा राहील. पाऊस नसल्याने पिके जळून जातील. जमिनीतील ओलावा संपेल. ती शुष्क होईल, सेंद्रिय पदार्थ संपतील. इतकेच नव्हे, तर मायक्रोब्ज् नष्ट होतील. त्यामुळे जमिनीचा कसदारपणा संपून जाईल. यावर कृषी खात्याने मिलेट्स (तृण धान्य) वर भर द्यावा. कमी पाण्यात कमी कसदार जमिनीत होणारे मिलेट्स हेच पीक तग धरेल. यासाठी व्यापक मोहीम हाती घ्यावी लागेल. महाराष्ट्रात मिलेट्स मिशन ॲक्टिव्हेट करणे गरजेचे आहे. सध्या राज्यात दुष्काळ जाहीर झाला असला तरी आपल्याला पाण्याची समस्या भेडसावत राहील. पिण्याच्या पाण्याचे नियोजन कसे करावे. पाण्याचे नैसर्गिक स्रोत हे आटले आहेत. अगदी गोदावरीला पाणी आटले आहे, तर तिच्या ट्रिब्युटरीजना पाणी कुठे राहणार? कमाल उष्णतेमुळे बाष्पीभवनचा वेग वाढणार आहे. जमिनीतील ओलावा संपला आहे किंवा संपत चालला आहे. तसेच सध्या एल- निनोच्या प्रभावामुळे राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. पण शेतकरी हा हवालदील झाला आहे. त्याला नैराश्याच्या गर्तेतून काढण्यासाठी २०१६-१७ मध्ये राबवलेला प्रेरणा प्रकल्प राबविणे गरजेचे आहे. त्याला आर्थिक मदतीबरोबर मानसिकदृष्ट्या उभे करणेही आवश्यक आहे. हा कालावधी मनुष्य जातीसाठी कोविडप्रमाणेच कसोटीचा काळ असेल.

(क्लायमेट चेंज एक चक्रव्यूह या पुस्तकाचे लेखक)

आजचे राशिभविष्य, १२ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Navratri 2026 : उपवासासाठी बनवा चविष्ट अन् हेल्दी पदार्थ; पाहा सोप्या रेसिपी

Navratri 2026 : उपवासातही खाता येईल असा खमंग आलू पराठा; साबुदाणा आणि बटाट्यापासून बनवा सोपी रेसिपी

नवरात्रीच्या उपवासात काय खावं-काय टाळावं? तब्येत बिघडू नये म्हणून लक्षात ठेवा

महागड्या शाम्पूला पर्याय शोधताय? आवळा, रिठा आणि शिकेकाईपासून घरच्या घरी बनवा हर्बल शाम्पू