फोटो

१.५ वर्ष ICU मध्ये, ४.५ महिने व्हेंटिलेटरवर...GBS च्या विळख्यातून बाहेर आलेल्या रुग्णाने कथन केला अनुभव

Swapnil S
पुण्यामध्ये GBS च्या रुग्णांमध्ये वाढ होत असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि रुग्णांची संख्या आता १०० च्या वर पोेहचली आहे.
साधारण ८०-९० हजार लोकांपैकी एकाला हा आजार होतो. याची कारणं अजून अस्पष्ट आहेत. पण प्राथमिक माहितीनुसार एखाद्या विषाणू किंवा बॅक्टेरिया इन्फेक्शननंतर हा आजार होतो.
GBS हा खूप गंभीर आजार आहे परंतु योग्य उपचार आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्याच्यावर मात करता येते.
मागील काही काळात GBS आजारामुळे त्रस्त असणारे आणि आता पूर्णपणे बरे झालेले कल्याण येथील निलेश अभंग यांनी GBS या गंभीर आजाराचा त्यांचा अनुभव आणि तो आजार झाल्यानंतर त्यावरील उपचार व काळजी यासंदर्भात फेसबुकवर माहिती दिली आहे.
GBS वर उपचार करताना IVIG (intravenous immunoglobulin) ची २२ ते २५ इंजेक्शन देतात, त्याची मात्रा रुग्णाच्या वजनानुसार ठरते.
सुरवातीला आजाराचे निदान करून लवकरात लवकर इलाज केला तर GBS कमी कालावधीत बरा होऊ शकतो
जे रुग्ण व्हेंटिलेटरवर गेलेले नाहीत, फक्त हात किंवा पाय, किंवा हातपाय Paralysed झाले आहेत, त्यांना फार काळ हॉस्पिटलमध्ये राहावे लागणार नाही. त्यांना IVIG चे इंजेक्शन देऊन, आवश्यक इलाज करून दहा-बारा दिवसांत घरी पाठवले जाईल.
रुग्णावर उपचार करण्यासाठी गळ्याला छिद्र पाडावे लागतात. बरेच नातेवाईक छिद्र पाडायचे की नाही याबाबत चिंतेत असतात, पण ते पाडण्याशिवाय दुसरा उपाय नसतो आणि सध्याच्या घडीला रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी ते करणे गरजेचे असते.
GBS कडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर उपचार घेणे घेणे हेच महत्वाचे आहे.
योग्य उपचार, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सध्या निलेश अभंग या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस