अभिषेक शर्मा 'या' मॉडेलच्या प्रेमात? रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना नेटकऱ्यांमध्ये उधाण संग्रहित छायाचित्र
फोटो

अभिषेक शर्मा 'या' मॉडेलच्या प्रेमात? रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना नेटकऱ्यांमध्ये उधाण

Kkhushi Niramish
वानखेडे स्टेडियमवर अभिषेकने ५४ चेंडूंत १३५ धावांची शतकी खेळी साकारल्यामुळे भारताने इंग्लंड विरुद्धचा सामना अलगदपणे खिशात घातला. त्यानंतर अभिषेक शर्मा क्रिकेट प्रेमींच्या गळ्यातील ताईत बनला आहे.
भारताचा हा स्टार फलंदाज आणखी एका कारणासाठी चर्चेत आहे. तो लैला फैसल हिच्या सोबतच्या रिलेशनशिपमुळे...
कोण आहे ही 'लैला फैसल' जिच्या सोबत अभिषेक शर्माचे नाव जोडले जात आहे. दोघं खरचं एकमेकांना डेट करत आहेत का?
रिपोर्टच्या अनुसार, 24 वर्षीय लैला फैसल ही दिल्लीची असून ती 'सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर' आहे.
तिला फॅशन डिझायनिंगची आवड आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर दिलेल्या माहितीनुसार, 'LRF Designs' या नावाने कपड्यांचा लक्झरी ब्रँड देखील सुरू केला आहे. (LRF - Laila Roohi Faisal)
डिसेंबर 2024 मध्ये Reddit ने एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमुळे अभिषेक आणि लैला एकमेकांना डेट करत असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली.
लैला फैसलने लंडन येथून सायकॉलॉजी या विषयात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.
पदवीच्या शिक्षणासह लैलाने 'University of Arts London' येथून ब्रँडिंग आणि डिझायनिंगचे काही कोर्स केल्याची देखील माहिती आहे.
भारताचा स्टार युवा क्रिकेटर अभिषेक शर्मा आणि लैला फैसल यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत आहे. त्यामुळे त्यांच्या कथित रिलेशनशिपबाबत मोठी चर्चा आहे.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश