फोटो

अभिनेत्री अपूर्वा गोरेचं ठरलं लग्न; सोशल मीडिया पोस्टने वेधलं साऱ्यांचं लक्ष, होणारा नवरा कोण? पाहा Photo's

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा गोरेने इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाची बातमी शेअर केली आहे. अपूर्वाने तिचं लग्न ठरल्याचं सांगत फोटो शेअर केले आहेत.

किशोरी घायवट-उबाळे

सेलिब्रिटी लगीनघाईचा जोर

सध्या अनेक मराठी अभिनेत्रींच्या लग्नाच्या बातम्या चर्चेत असून या यादीत आता अपूर्वा गोरेचं नावही सामील झालं आहे.

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची गूड न्यूज

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' मधील ईशाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा गोरे सध्या चर्चेत आहे.

सोशल मीडियावर लग्न ठरल्याची घोषणा

अपूर्वाने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना लग्न ठरल्याची आनंदाची बातमी दिली.

होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटो शेअर

अपूर्वाने तिच्या होणाऱ्या जोडीदारासोबतचे फोटो शेअर केले असून हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हिरव्या साडीत पारंपारिक लूक

हिरव्या रंगाची साडी, हातात लाल बांगड्या, गळ्यात नाजूक गोल्डन ठुशी आणि हातात गुलाबाचं फूल असा अपूर्वाचा पारंपारिक अंदाज चाहत्यांना प्रचंड भावला आहे. तर तिच्या होणाऱ्या पार्टनरने लाल ब्राऊन रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.

कॅप्शनमुळे वाढली उत्सुकता

"चाफा आणि तो… मला खूप आवडतात… #ठरलं" असं कॅप्शन देत अपूर्वानं पोस्ट शेअर केली आहे.

होणारा नवरा नेमका कोण?

अपूर्वाने होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा न दाखवल्याने तो नक्की कोण आहे, कसा दिसतो याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

अपूर्वाने सोनी वाहिनीवरील 'ती फुलराणी' या मराठी मालिकेत काम केले होते. त्यानंतर २०२१ मध्ये स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेतून ती घराघरांत पोहचली. या मालिकेतील तिची ईशाची भूमिका लोकप्रिय ठरली.

मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर आज वाहतूक ब्लॉक; बोरघाटमार्गे मुंबई वाहिनीवरील सर्व जड, अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान; महापालिका, जिल्हा परिषद सदस्यांना पक्षादेश जारी, २२ जूनला मतमोजणी

Operation Tiger : यावेळचा मुहूर्त का हुकला?

Operation Tiger : जनता रस्त्यावर फिरू देणार नाही; संजय राऊतांचा 'फुटीरां'ना इशारा

पक्षाचे विलिनीकरण होऊ शकते, गटाचे नाही; लोकसभा अध्यक्षांच्या भेटीनंतर अनिल देसाईंचा मोठा दावा