फोटो

Badlapur :गुढी पाडव्याच्या जल्लोषात कात्रप दुमदुमले; ढोल-ताशे, बाईक रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला उत्सव, पाहा Photos

बदलापूर (पूर्व) येथील कात्रप परिसरात गुढी पाडव्याच्या निमित्ताने भव्य आणि उत्साहपूर्ण शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले. ढोल-ताशे, महिलांची बाईक रॅली, पारंपरिक वेशभूषा स्पर्धा, रील मेकिंग स्पर्धा आणि मलखांब-लाठीकाठीच्या प्रात्यक्षिकांनी उत्सवाला विशेष रंगत आणली. या मराठमोळ्या जल्लोषाचे खास Photos पाहा.

Krantee V. Kale

गुढी पाडव्याच्या निमित्ताने बदलापूर (पूर्व) येथील कात्रप परिसरात भव्य आणि उत्साहपूर्ण शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित या सोहळ्यात स्थानिक नागरिकांसह युवक-युवतींनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत सणाचा आनंद द्विगुणित केला.

पहाटेपासूनच पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत सजलेले नागरिक बदलापूर (पूर्व) येथील कात्रप तलाव परिसरात जमा होऊ लागले होते. ढोल-ताशांच्या गजरात, जयघोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण परिसर गुढी पाडव्याच्या रंगात रंगून गेला होता.

संपूर्ण कात्रप परिसर महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या आकर्षक फलकांनी आणि देखण्या सजावटीने नटला होता. गुढी पाडव्याच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या या सांस्कृतिक सोहळ्याने परिसरातील नागरिकांना एक वेगळीच उत्सवी अनुभूती दिली.

श्री राम प्रतिष्ठान आणि नगरसेवक आदित्य नरहरी पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित या शोभा यात्रेत विविध सांस्कृतिक उपक्रमांनी विशेष रंगत आणली. पारंपरिक वेशभूषा स्पर्धा, रील मेकिंग स्पर्धा आणि महिलांसाठी आयोजित विशेष बाईक रॅलीमुळे कार्यक्रम अधिक आकर्षक ठरला.

महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे बदलापूरच्या कात्रपमधील गुढी पाडवा सोहळ्याला विशेष उठाव मिळाला. विशेष बाईक रॅलीसह विविध उपक्रमांमध्ये महिलांनी आत्मविश्वासाने सहभाग घेत सणाचा उत्साह अधिक वाढवला.

या शोभा यात्रेत लाठी-काठी, मलखांब यांसारख्या पारंपरिक खेळांची थरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. उपस्थितांनी या सादरीकरणांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत पारंपरिक मराठी कलेचा आणि शौर्यपरंपरेचा आनंद घेतला.

छत्रपती शिवाजी महाराज, विठ्ठल-रखुमाई, खंडोबा-म्हाळसा, संत तुकाराम तसेच हनुमान यांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले. त्यांच्या आकर्षक सादरीकरणातून मराठी संस्कृती, परंपरा आणि अध्यात्माची सुंदर झलक पाहायला मिळाली.

कात्रप तलाव येथून सुरू झालेली ही भव्य शोभा यात्रा मोठ्या जल्लोषात आणि शिस्तबद्ध वातावरणात घोरपडे चौक येथे समाप्त झाली. संपूर्ण मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मराठी नववर्षाचे स्वागत आनंदात साजरे केले.

कार्यक्रमाच्या शेवटी विविध स्पर्धांमधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे सहभागी नागरिकांचा उत्साह अधिक वाढला आणि सणाच्या आनंदात आणखी भर पडली.

बदलापूर (पूर्व) येथील कात्रप परिसरात आयोजित गुढी पाडव्याच्या या भव्य शोभा यात्रेतून एकात्मता, सांस्कृतिक जतन आणि मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्याचा सुंदर संदेश देण्यात आला. नागरिकांचा मोठा सहभाग, पारंपरिक उपक्रम आणि मराठमोळा जल्लोष यामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला.

देशात सर्वात कोरडा मान्सून; एल-निनोचा फटका; सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस

विशाखा राऊत यांना न्यायालयाचा तात्पुरता दिलासा; जागा रिक्त ठेवण्याचे निर्देश

Pune : पुरंदर विमानतळाचा मार्ग झाला मोकळा; विरोधातील याचिका फेटाळली

कोयना धरण परिसरात भूकंपाचे पाच सौम्य धक्के; कोयनानगरचे भूकंपमापन केंद्र बंद

कर्जतमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; विजेच्या ठिणगीने मच्छरदाणी पेटली