फोटो

ग्रीन टीचे फायदे अनेक, पण... 'या' चुका पडतील महागात

Swapnil S
अनोशेपोटी ग्रीन टी पिणे जर तुम्ही सकाळी अनोशेपोटी ग्रीन टीचं सेवन करताय, तर ही चूक तुम्हाला महागात पडू शकते. जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात ग्रीन टीने करत असाल तर, हे आजच बंद करा. अनोशेपोटी ग्रीन टी प्यायल्याने अॅसिड वाढते. पचनाशी संबंधित कोणतीही समस्या टाळण्यासाठी ग्रीन टी पिण्यापूर्वी काहीतरी हेल्दी खा.
जास्त प्रमाणात ग्रीन टी पिणे ग्रीन टी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात, असे मानले जाते. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक अत्यंत वाईट मानला जातो. ग्रीन टी जास्त प्रमाणात प्यायल्यास तणाव, निद्रानाश आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. दररोज दोन किंवा तीन कप पेक्षा जास्त ग्रीन टी पिऊ नका, हे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.
टी बॅग पुन्हा वापरणे ग्रीन टी बॅग्ज पुन्हा वापरणे टाळा. कारण टी बॅग्ज पुन्हा वापरल्याने चहाची चव चांगली राहत नाही. तसेच हा चहा आरोग्यदायी ठरत नाही. यामुळे तुम्हाला पुरेसे पोषण मिळत नाही. प्रत्येक वेळी ग्रीन टी पिताना नेहमी ताजी पाने किंवा नवीन टी बॅग वापरा.
रात्री झोपताना ग्रीन टी पिणे ग्रीन टीमध्ये कॅफिन देखील असल्याने रात्रीच्या वेळी प्यायल्याने झोपेवर वाईट परिणाम होतो. यामुळेच झोपण्यापूर्वी कधीही ग्रीन टीचे सेवन करू नये.
जेवणानंतर लगेचच ग्रीन टी पिणे जेवल्यानंतर लगेचच ग्रीन टी पिण्याची चूक चुकूनही करू नये. कारण त्यामुळे अन्नातून पोषक तत्त्वे मिळण्यात अडथळे निर्माण होतात. यामुळे अन्नातील लोहाचे शोषण होण्यास अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. जर तुम्हाला ग्रीन टी प्यायची असेल तर जेवल्यानंतर 1-2 तासांनंतरच ग्रीन टी प्या.
औषधांसह ग्रीन टी पिणे ग्रीन टी काही औषधांसोबत घेतल्यास त्यामध्ये प्रक्रिया होऊन याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. यामध्ये एन्टीडिप्रेसंट्स, ब्लड थिनर्स आणि ब्लड प्रेशरच्या औषधांचा समावेश आहे. तुम्ही असे कोणतेही औषध घेत असाल, तर ग्रीन टीचे सेवन टाळा किंवा तसे करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस