'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
फोटो

Diwali Beauty Gifts : दिवाळीच्या भेटवस्तूंसाठी बेस्ट पर्याय! प्रसिद्ध ब्रँड्सचे खास ब्युटी गिफ्ट सेट्स एकदा पाहाच

स्किनकेअर, मेकअप, परफ्यूम आणि खास फेस्टिव्ह गिफ्ट हॅम्पर्स अशा अनेक पर्यायांमधून प्रियजनांसाठी सुंदर भेटवस्तू निवडता येतील.

किशोरी घायवट-उबाळे

दिवाळीत फराळ आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण होतच असते. त्यात सणासुदीच्या काळात आपल्या जवळच्या व्यक्तींना त्यांच्या आवडीची भेट देण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. यंदा नेहमीच्या मिठाईच्या बॉक्सऐवजी काहीतरी वेगळं आणि उपयोगी गिफ्ट द्यायचं असेल, तर ब्युटी प्रोडक्ट्सचा पर्याय निवडू शकता. स्किनकेअर, मेकअप, परफ्यूम आणि खास फेस्टिव्ह गिफ्ट हॅम्पर्स अशा अनेक पर्यायांमधून प्रियजनांसाठी सुंदर भेटवस्तू निवडता येतील. काही प्रसिद्ध ब्रँड्सने दिवाळीनिमित्त खास कलेक्शन आणि आकर्षक गिफ्ट सेट्स सादर केले आहेत. जाणून घेऊया असेच काही हटके ब्युटी गिफ्ट्सचे पर्याय.

१. कामा आयुर्वेद - पारंपरिक आयुर्वेदिक सौंदर्यप्रसाधनांची आवड असणाऱ्यांसाठी भेट

आयुर्वेदिक स्किनकेअरला पसंती देणाऱ्या व्यक्तींसाठी कामा आयुर्वेद (Kama Ayurveda) चे फेस्टिव्ह गिफ्ट हॅम्पर्स चांगला पर्याय ठरू शकतात. या कलेक्शनमध्ये आयुर्वेदिक सौंदर्यपरंपरेसोबत राजस्थानच्या पारंपरिक हस्तकलेची झलक पाहायला मिळते.

जयपूरमधील लहरिया नक्षी आणि ब्लॉक प्रिंटिंगपासून प्रेरणा घेऊन या मर्यादित आवृत्तीतील कलेक्शनचे पॅकेजिंग तयार करण्यात आले आहे. ब्रँड ॲम्बेसेडर राजकुमारी गौरवी कुमारी यांचाही या उपक्रमात सहभाग आहे. त्यामुळे सौंदर्यप्रसाधनांसोबतच भारतीय कलापरंपरेचा अनुभव देणारी ही भेट ठरू शकते.

२. जो मालोन लंडन - सुगंधासोबत आकर्षक ॲक्सेसरीजची भेट

प्रिय व्यक्तीला परफ्यूम किंवा सुगंधी उत्पादने भेट द्यायची असतील, तर जो मालोन लंडन (Jo Malone London) चे खास फेस्टिव्ह कलेक्शन पाहू शकता. या ब्रँडने डिझायनर अर्पिता मेहता यांच्यासोबत दिवाळीनिमित्त विशेष सहकार्य केले आहे.

या कलेक्शनमध्ये सुगंधी उत्पादनांसोबत हाताने तयार केलेल्या आकर्षक ॲक्सेसरीजचाही समावेश आहे. आरशांच्या नक्षीकामाने सजवलेल्या बॅग्स, मखमली कापडाची बॅग, चमकदार पोटली, परफ्यूमच्या बाटल्यांसाठी खास अलंकार आणि फुलांच्या नक्षीचा स्कार्फ असे पर्याय यात आहेत. त्यामुळे ही भेट केवळ सौंदर्यप्रसाधनांपुरती मर्यादित राहत नाही.

३. ऑगस्टिनस बॅडर - स्किनकेअरप्रेमींसाठी खास चार टप्प्यांचा सेट

त्वचेची नियमित काळजी घेणाऱ्या व्यक्तीसाठी ऑगस्टिनस बॅडर (Augustinus Bader) चे स्किनकेअर कलेक्शन भेट देऊ शकता. या सेटमध्ये द क्रीम, व्हिटॅमिन सी सीरम, फेस क्रीम मास्क आणि एसपीएफ ५० सनस्क्रीन अशा चार उत्पादनांचा समावेश आहे.

ब्रँडच्या टीएफसी८® तंत्रज्ञानावर आणि ३० वर्षांहून अधिक काळ केलेल्या संशोधनावर आधारित ही उत्पादने तयार करण्यात आली आहेत. त्वचेला ओलावा मिळावा, पोषण मिळावे आणि त्वचेची काळजी घेण्याची नियमित दिनचर्या तयार व्हावी, या उद्देशाने हा सेट सादर करण्यात आला आहे.

४. लँकोम - मेकअप आणि स्किनकेअरचा आकर्षक मेळ

मेकअपची आवड असणाऱ्या व्यक्तीला काहीतरी खास भेट द्यायची असेल, तर लँकोम (Lancôme) चे फेस्टिव्ह गिफ्ट सेट्स हा पर्याय ठरू शकतो. ब्रँडने 'शेअर युवर लाइट' ही खास मोहीम सादर केली असून अभिनेत्री सोनम कपूर या मोहिमेत सहभागी झाली आहे.

या कलेक्शनमध्ये सुगंधी उत्पादने, स्किनकेअर आणि मेकअप सेट्सचा समावेश आहे. The Fragrance Icons, Sonam’s Festive Faves and The Idôle Box असे गिफ्ट सेट्स यात उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, ग्राहकांना स्वतःच्या आवडीनुसार ब्युटी गिफ्ट हॅम्पर तयार करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे.

५. फॉरेस्ट इसेन्शियल्स - भारतीय हस्तकलेची झलक असलेले गिफ्ट बॉक्स

भारतीय संस्कृती आणि पारंपरिक कलांचा स्पर्श असलेली भेटवस्तू द्यायची असेल, तर फॉरेस्ट इसेन्शियल्स (Forest Essentials) चे Tapestries of India हे कलेक्शन पाहता येईल. भारतातील नऊ वस्त्रकला परंपरांपासून प्रेरणा घेऊन या कलेक्शनमध्ये १० आकर्षक गिफ्ट बॉक्स तयार करण्यात आले आहेत.

कांजीवरम, बांधणी, पैठणी, इकत, सोजनी आणि फुलकारी अशा विविध कलाप्रकारांचा यात समावेश आहे. यातील 'कल्याणी' हा गिफ्ट बॉक्स कांजीवरम रेशीम परंपरेपासून प्रेरित असून त्यात शरीराची काळजी घेण्यासाठी सहा टप्प्यांच्या बॉडीकेअर पद्धतीतील उत्पादनांचा समावेश आहे. त्यामुळे ही भेट पारंपरिक कला आणि सेल्फ केअर यांचा सुंदर संगम ठरते.

६. मेबेलिन न्यूयॉर्क - मिठाईच्या रंगछटांपासून प्रेरित लिपस्टिक कलेक्शन

दिवाळी आणि मिठाई यांचे खास नाते आहे. याच गोडव्यापासून प्रेरणा घेत मेबेलिन (Maybelline) न्यूयॉर्कने भारतीय ग्राहकांसाठी  Super Stay Vinyl Ink Mithai Collection सादर केले आहे.

लोकप्रिय भारतीय मिठाईंच्या रंगछटांवर आधारित या कलेक्शनमध्ये पाच वेगवेगळे शेड्स आहेत. यामध्ये उठावदार रंग आणि चमकदार विनाइल फिनिश मिळते. या लिप प्रोडक्ट्सचा रंग १६ तासांपर्यंत टिकतो आणि दुसऱ्या पृष्ठभागावर उमटत नाही, असा ब्रँडचा दावा आहे. वेगळ्या रंगछटांचे लिप प्रोडक्ट्स वापरण्याची आवड असणाऱ्यांसाठी ही भेट आकर्षक ठरू शकते.

७. डिप्टिक - दैनंदिन सेल्फ केअरला सुगंधी अनुभवाची जोड

सुगंधी उत्पादने आणि वैयक्तिक निगा राखण्याच्या वस्तू आवडणाऱ्या व्यक्तीसाठी डिप्टिक (Diptyque) चे Les Rituels de Soin हे कलेक्शन निवडता येईल. प्राचीन स्नानविधींच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन हे कलेक्शन तयार करण्यात आले आहे.

यामध्ये सुगंधी लोशन्स, त्वचेला पोषण देणारे बाम, विविध प्रकारची तेले आणि मेणापासून तयार केलेली उत्पादने उपलब्ध आहेत. यासोबत आकर्षक ॲक्सेसरीजचाही समावेश आहे. आंघोळ आणि त्वचेची निगा राखण्याच्या दैनंदिन सवयींना अधिक खास अनुभव देणारी ही भेट ठरू शकते.

भेटवस्तू निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा

दिवाळीत ब्युटी प्रोडक्ट्स भेट देताना समोरच्या व्यक्तीची त्वचा, आवड आणि गरज लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. स्किनकेअर उत्पादने निवडताना त्वचेचा प्रकार आणि घटकांची माहिती तपासा. मेकअपमध्ये कोणत्या रंगछटा आवडतात, याचा विचार करा. तसेच गिफ्ट सेटमधील उत्पादनांची संख्या, आकार आणि किंमत यांची तुलना करून आपल्या बजेटनुसार पर्याय निवडा. महागडी भेट देण्यापेक्षा आवड आणि गरज लक्षात घेऊन निवडलेली छोटीशी भेटही दिवाळीचा आनंद द्विगुणित करू शकते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maharashtra Board Exam 2027 : दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर! कोणता पेपर कधी? जाणून घ्या एका क्लिकवर

बिश्नोई टोळीला मोठा धक्का! जवळचा साथीदार हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत; रोहित शेट्टी, रणवीर सिंहला धमकी दिल्याचा आरोप

सरकारी कर्मचाऱ्यांची सक्तीची निवृत्ती म्हणजे शिक्षा नव्हे - सर्वोच्च न्यायालय

Mumbai : बेस्ट बसमध्ये आता सुट्ट्या पैशांची कटकट संपणार? QR कोड स्कॅन करून तिकीट काढण्याचा प्रस्ताव

Thane : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वर्ग करण्याची याचिका फेटाळली