Dussehra 2026 : आपट्याची पानं म्हणजे सोनं! काय आहे या परंपरेमागची रंजक कथा? 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
फोटो

Dussehra 2026 : आपट्याची पानं म्हणजे सोनं! काय आहे या परंपरेमागची रंजक कथा?

दसऱ्याला आपट्याची पानं सोनं म्हणून का वाटली जातात? जाणून घ्या या परंपरेमागची रंजक पौराणिक कथा आणि तिचं महत्त्व.

किशोरी घायवट-उबाळे
दसरा आणि आपट्याच्या पानांचं खास नातं! दसरा किंवा विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ सण मानला जातो. या दिवशी आपट्याची पानं सोनं म्हणून एकमेकांना देण्याची परंपरा आजही जपली जाते.
या परंपरेमागे आहे एक रंजक आख्यायिका! पुराणकथांनुसार, महाकवी कालिदासांच्या ‘रघुवंश’ या काव्यात रघुराजाच्या दानशूरतेची कथा सांगितली आहे. याच कथेशी आपट्याची पानं सोनं म्हणून वाटण्याची प्रथा जोडली जाते.
कोण होता कौत्स? कौत्स हा पैठणमधील देवदत्त नावाच्या विद्वानाचा मुलगा होता. त्याने वरतंतु ऋषींकडे चौदा विद्या शिकून शिक्षण पूर्ण केलं होतं.
गुरूंनी मागितली चौदा कोटी सुवर्णमुद्रांची गुरुदक्षिणा! शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कौत्साने गुरुदक्षिणा देण्याचा आग्रह धरला. तेव्हा वरतंतु ऋषींनी त्याच्याकडे चौदा कोटी सुवर्णमुद्रा मागितल्या.
कौत्स पोहोचला दानशूर रघुराजाकडे! गुरुदक्षिणेची व्यवस्था करण्यासाठी कौत्स रघुराजाकडे गेला. मात्र, विश्वजीत यज्ञानंतर राजाने आपली सर्व संपत्ती दान केली असल्याने त्याच्याकडेही धन शिल्लक नव्हतं.
कुबेराने केला सुवर्णमुद्रांचा वर्षाव! कौत्साची मागणी पूर्ण करण्यासाठी रघुराजाने धनसंपत्तीचा अधिपती कुबेरावर स्वारी करण्याचा विचार केला. युद्ध टाळण्यासाठी कुबेराने सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला, अशी आख्यायिका सांगते.
कौत्साने घेतल्या फक्त चौदा कोटी सुवर्णमुद्रा! रघुराजाने दिलेल्या सोन्यातून कौत्साने आपल्या गुरूंच्या मागणीनुसार चौदा कोटी सुवर्णमुद्राच घेतल्या. उरलेलं सोनं त्याने स्वीकारलं नाही आणि ते आपटा व शमीच्या झाडांखाली ठेवण्यात आलं, अशी कथा आहे.
अशी सुरू झाली आपट्याची पानं सोनं म्हणून वाटण्याची प्रथा! उरलेलं सोनं लोकांनी घरी न्यावं, असं कौत्साने सांगितल्याचं आख्यायिकेत म्हटलं जातं. या कथेशी दसऱ्याला आपट्याची पानं सोनं म्हणून एकमेकांना देण्याची परंपरा जोडली जाते.
दसऱ्याच्या दिवशी लोक एकमेकांना आपट्याची पानं देत "सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा" असा शुभेच्छा संदेश देतात. हे पान केवळ सुवर्णाचं प्रतीक नसून समृद्धी, ज्ञान आणि सद्भावनेचं प्रतीक मानलं जातं.
या परंपरेतून संपत्तीइतकंच सद्गुण आणि स्नेह जपण्याचा सुंदर संदेश दिला जातो.

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्या तिघांना अटक; मुंबई पोलिसांनी राजस्थानच्या कोटामधून घातल्या बेड्या

रत्नागिरीत पोलिसांची 'समुद्रभरारी'! QRT च्या १८ जवानांना बोट सेलिंगचे प्रशिक्षण; सागरी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पोलीस दल सज्ज

परिवर्तन झाले असेल, तर देशात उजव्या शक्तींचे सरकार सत्तेत कसे आले? ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांचा सवाल

Pune : निष्काळजीपणाचा बळी! ड्रेनेजच्या १५ फूट खोल खड्डयात पडून ज्येष्ठ नागरिकाचा करुण अंत, घटना CCTV मध्ये कैद

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी, व्हिडिओ लावल्यास १००० रु. दंड; थेट तुरूंगवासही, दक्षिण रेल्वेचा नवा नियम