फोटो

थंडीमध्ये पालक खा, हायड्रेटेड रहा; जाणून घ्या, पालक खाण्याचे फायदे

Swapnil S
पालकमध्ये झेक्सॅन्थिन आणि ल्युटीन भरपूर प्रमाणात असतं. त्यामध्ये कॅरोटीनॉइड्स असतात, जे डोळ्यांना होणार्‍या कोणत्याही नुकसानापासून संरक्षण करतात. अनेक अभ्यासांनुसार, झेक्सॅन्थिन आणि ल्युटीन डोळ्यांना मोतीबिंदूपासून वाचवतात. पालकामध्ये आढळणारं व्हिटॅमिन 'ए' श्लेष्मल त्वचा टिकवून ठेवण्यास मदत करतं, जे दृष्टीसाठी आवश्यक आहे.
हाडाच्या आरोग्यासाठी पालक खाणे खूप उपयुक्त आहे. पालक हाडांच्या निर्माणापासून तर त्यांच्या विकासापर्यंत मदत करतो. हाडांना मजबुती देतो. पालकमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. जे हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त असते.
पालक फायबर आणि पाण्याने भरलेले असते. फायबर पचन तंत्र नियंत्रित करण्यास आणि त्याचे कार्यरत सुधरण्यासाठी काम करतो. पालक खाल्ल्याने अपचन, गॅसेस यांसारख्या समस्या दूर होतात. पालक पोटाच्या कॅन्सरपासूनही रक्षण करते.
हिवाळ्याच्या मोसमात लोकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. पालक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतो. आरोग्य तज्ज्ञ हिवाळ्यात अधिकाधिक पालक खाण्याचा सल्ला देतात. त्यात केवळ बीटा-कॅरोटीनच समृद्ध नाही, तर त्यात सर्व आवश्यक अँटीऑक्सिडंट्सही असतात. त्यात व्हिटॅमिन सी देखील भरपूर आहे, जे शरीराला संक्रमणाशी लढण्यास मदत करतं.
काही लोकांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असते. अशांनी आपल्या आहारात पालकाचा समावेश करुन घ्यावा. पालकामध्ये भरपूर प्रमाणात फोलेट असतं, जे लाल रक्तपेशी वाढवण्यासाठी आवश्यक मानलं जातं. हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला प्रत्येक डॉक्टर देतात. हिरव्या भाज्यात सर्व प्रकारचे पोषक तत्व आढळता. पालक जास्त करून थंडीच्या दिवसात येतो. तसे पाहता आजकाल बाराही महिने सर्व भाज्या मिळतात. परंतु पावसाळ्यात येणाऱ्या पालक मध्ये माती व किटाणू असतात. म्हणून त्यावेळी पालक खाणे शक्यतो टाळा.
पालकमध्ये भरपूर नायट्रेट असते, ज्यामुळे रक्तदाबाची पातळी संतुलित राहते आणि हृदयविकारापासून बचाव होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पालक खाल्ल्यानं रक्तदाबाची पातळी प्रभावीपणे कमी होते. त्यामुळे हृदय निरोगी राहते. पालकामध्ये पोटॅशियम भरपूर असतं आणि सोडियमचं प्रमाण खूप कमी असतं. त्यामुळं रक्तदाबाच्या रुग्णांनी पालक जरूर खाल्ला पाहिजे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस