फोटो

मुंबई ते नवी मुंबई फक्त २० मिनिटांत, सर्वात लांब 'अटल सेतू'वर टोल टॅक्स किती? बघा सर्व वैशिष्ट्ये एकाच क्लिकवर

Swapnil S
देशातील सर्वात जास्त २२ किलोमीटर लांबीचा समुद्री मार्गावरील 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू' (मुंबई पारबंदर प्रकल्प) अर्थात एमटीएचएलचे येत्या १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद‌्घाटन होत आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर सागरी मार्ग (एमटीएचएल) हा अति जलद, अति महत्त्वाचा आणि स्थापत्य अभियांत्रिकीचा देशातील आदर्श नमुना आहे.
५०० बोइंग विमाने व १७ आयफेल टॉवर एवढ्या वजनाच्या लोखंडाचा वापर या प्रकल्पात केला आहे.शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू एकूण २२ किमी लांबीचा असून त्यातील १६.५० किमी भाग समुद्रामध्ये तर उर्वरित ५.५० किमी भाग जमिनीवर आहे.
अटल सेतू या सागरी मार्गाच्या दोन्ही बाजूने शिवडी येथील फ्लेमिंगो पक्ष्यांच्या संरक्षणाकरिता पहिल्या शून्य ते चार किलोमीटर दरम्यान दोन्ही बाजूने ध्वनी संरक्षक बसविले आहेत.
अतिसंवेदनशील अशा भाभा अणु संशोधन केंद्र तसेच माहुल येथील तेल शुद्धीकरण केंद्र या चार ते दहा किलोमीटर अंतरामध्ये संरक्षणासाठी दृश्य अडथळे बसविण्यात आले आहेत.
भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू तर जगातील १२ व्या क्रमांकाचा सागरी सेतू हा आहे. सागरी सेतू मुंबई बंदर व जवाहरलाल नेहरू पोर्ट या दोन प्रसिद्ध बंदरांना जोडणारा हा मार्ग आहे.मुंबई, नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रूतगती महामार्ग तसेच मुंबई-गोवा महामार्ग यातील अंतर सुमारे १५ किमीने कमी झाले आहे. महासेतू पूर्ण होण्यासाठी सुमारे सात वर्षांचा कालावधी लागला आहे.
सर्वसाधारणपणे टोल आकारणीच्या नियमाप्रमाणे वाहनांसाठी येणाऱ्या दरापेक्षा ५० टक्के कमी दराने टोल आकारण्यात येणार असल्याचा दावा सरकारने केला आहे.
-राज्य सरकारने या पुलावरून धावणाऱ्या कार अर्थात चारचाकी वाहनासाठी २५० रुपये इतका टोल निश्चित केला आहे. एमटीएचएलवर कारसाठी ५०० ऐवजी २५० रुपये आकारण्यात येतील. वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी परतीचा पास एकेरी टोलच्या दीडपट, दैनिक पास एकेरी टोलच्या अडीचपट आणि मासिक पास एकेरी टोलच्या ५० पट अशी सवलत देण्यात आली आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस