फोटो

Happy 50th birthday to Hrithik Roshan: सेटवर झाडू मारावा लागला, आर्थिक चणचणीमुळे आजीच्या घरीही राहिला

Swapnil S
आज हृतिक रोशनचा 50 वा वाढदिवस आहे. त्याचा जन्म 10जानेवारी, 1974 रोजी झाला.हृतिकचा नंबर देशातील टॉप स्टार आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये येतो. पण तो 8 वर्षांचा असताना त्यांच्या कुटुंबाला घरमालकाने घराबाहेर हाकलून दिले होते. हृतिकला आज तो जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. वडील राकेश रोशन हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध स्टार आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते असतानाही हृतिकला शून्यातून सुरुवात करावी लागली आहे. एक काळ असा होता जेव्हा तो सेटवर लोकांना चहा द्यायचा आणि फरशी झाडून घ्यायचा.
हृतिकचे बालपण गंभीर आर्थिक संकटात गेले आणि यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. पण ही वास्तविक घटना आहे. हृतिकच्या जन्माच्या वेळी वडील राकेश रोशन दिग्दर्शनाच्या दुनियेत संघर्ष करत होते. अभिनयाच्या दुनियेतून ते दिग्दर्शनाकडे वाटचाल करत होते. 1980 मध्ये राकेश रोशन यांनी एका चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, जो फ्लॉप ठरला होता. अनेक वर्षे त्यांचा संघर्ष सुरूच होता. अशा परिस्थितीत हृतिकला जवळपास 6 महिने त्याच्या आजी-आजोबांच्या घरी राहावे लागले होते.
हृतिक रोशनने 'कहो ना प्यार है' मधून हिरो म्हणून डेब्यू केला होता. पण याआधी तो बालकलाकार काम करत होता. त्याने रजनीकांतसोबत एका चित्रपटातही काम केले होते. त्यानंतर त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आणि जेव्हा तो मोठा झाला तेव्हा त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली.
फार कमी लोकांना माहित असेल की, राकेश रोशनला सुरुवातीला मुलगा हृतिकला 'कहो ना प्यार है' या चित्रपटामधून लॉन्च करायचे नव्हते. त्याची पहिली पसंती नव्हती. खरे तर त्यांनी याआधी हा चित्रपट शाहरुख खानला ऑफर केला होता. मात्र शाहरुखने ही गोष्ट नाकारली. त्यानंतर राकेश रोशन यांनी हृतिकलाच लॉन्च करण्याचा निर्णय घेतला होता.
हृतिक रोशनने एकदा नव्हे तर अनेक वेळा वर्ल्ड्स मोस्ट हँडसम मॅनचा किताब पटकावला आहे. याचा अर्थ तो जगातील सर्वात सुंदर दिसणार व्यक्ती आहे.
हृतिक रोशनचा प्रत्येक फोटो या गोष्टीचा साक्षीदार आहे की त्याच्या शरीरापासून त्याच्या चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांपर्यंत सर्व काही वेगळे आहे.तसेच त्याच्या डान्सवर देखील अनेक चाहते फिदा आहेत.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त