all images - you tube - MadhurasRecipe Marathi
उन्हाळा आला आहे. बाजारात फळांचा राजा आंबा मिरवतोय. मग अशात फक्त आमरस खाऊन कसं चालेल. चला जाणून घेऊया आंबा बर्फीची सोपी रेसिपी-
साहित्य - रेशेदार गर असलेले हापूस आंबे, पावकिलो खवा, तुमच्या आवडीनुसार पीठी साखर मात्र, किमान एक वाटी तरी असावी, एक चमचा तूप
कृती - सर्व प्रथम आंब्याचा गर काढून तो मिक्सरमधून काढून घ्या. पाणी टाकायचे नाही.असा घट्ट आंब्याचा गर मिक्सरमधून काढल्यानंतर पॅनमध्ये प्रथम शिवजवून घ्या.आंब्याचा गर शिजवताना त्याला चमच्याने फेटत राहात्यानंतर यामध्ये खवा छान किसून टाकाखवा घातल्यानंतर लगेचच बारीक केलेली पिठीसाखर घाला. हे मिश्रण चांगले शिजू द्या. मिश्रण निम्मे शिजल्यानंतर मायक्रोवेव्हमध्ये ठेवून चांगले घट्ट होईपर्यंत शिजवा. घट्ट झालेले मिश्रण एका ताटात थोडेसे तूप लावून छान पसरवून घ्या. वड्या पाडण्यासाठी किमान एक इंचाचा थर असू द्या. त्यावर ड्रायफ्रूट्स घाला.आंबा बर्फी तयार आहे. ही बर्फी फ्रिजमध्ये किमान चार ते पाच दिवस चांगली राहते.