राजस्थानातील एक शहर सध्या भारतातील निळा स्वर्ग अशी ओळख मिरवत आहे. हे शहर खूपच आकर्षक आणि सुंदर असून पर्यटकांचा इथे मोठा ओघ असतो. जाणून घेऊया या शहराबद्दल अधिक माहितीजोधपूर हे राजस्थानातील एक ऐतिहासिक, सांस्कृतिक शहर आहे. येथील घरांची रचना खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. आधुनिकता आणि प्राचीनता असा संगम इथे साधला गेला आहे. त्यामुळे पर्यटनासाठी हे शहर खूप नावाजलेले आहे. या शहराची स्थापना १४५९ मध्ये राव जोधा यांनी केली. हे शहर मारवाड प्रदेशाची राजधानी होते हे शहर सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे कारण येथील घरांवर दिला जाणारा निळा रंग. या शहरातील अनेक घर प्रामुख्याने निळ्या रंगात रंगवलेली असतात. त्यामुळे सकाळची सोनेरी किरणे आणि सायंकाळचा मंद प्रकाश या घरांवर पडला की संपूर्ण दृश्य मनोहारी दिसते.घरातील भिंतींना निळ्या रंगात रंगण्याचा ट्रेंड का पडला याची वेगवेगळी कारणे सांगितली जातात. कडक उन्हापासून गारवा मिळावा म्हणून घरांना निळ्या रंगात रंगण्याची पद्धत आहे, असे एक प्रमुख कारण सांगितले जाते. शहराच्या मध्यभागी स्थित मेहरानगड किल्ला हा जोधपूरच्या पर्यटनाचा मुख्य आकर्षण आहे. हा भव्य किल्ला १२५ मीटर उंचीच्या डोंगरावर बांधलेला असून त्यातून संपूर्ण शहराचा देखावा पाहता येतो.निळ्या रंगातील घरांचे हे नयनरम्य दृश्य पाहणे हा खूपच उत्तम अनुभव असतो. याशिवाय येथील घरांवरील जुन्या पद्धतीची कारिगरी हे याचं आणखी एक वैशिष्ट आहे. घर आधुनिक पद्धतीचे असो की जुन्या पद्धतीचे सर्वच ठिकाणी भिंतीवर आल्हाददायक निळ्या रंगाच्या छटा पाहायला मिळतात.मेहरानगड किल्ल्याशिवाय जसवंत थडा, उम्मेद भवन पॅलेस, मंडोर गार्डन आणि क्लॉक टॉवर बाजार या ठिकाणांसाठीही जोधपूर प्रसिद्ध आहे. याशिवाय सर्वसामांन्यांच्या घरावर सुद्धा अशा प्रकारे येथील लोकसंस्कृती दर्शवणारी चित्रे पाहायला मिळतात. पारंपारिक कला जपलेली पाहायला मिळते.