Miss World Facebook Page
फोटो

Miss World 2025: तेलंगणाची समृद्ध संस्कृती जगाचे लक्ष वेधणार; मिस वर्ल्ड स्पर्धेचा आज भव्य उद्घाटन सोहळा

Miss World 2025 ची स्पर्धा यंदा तेलंगणा येथे पार पडणार आहे. ही ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा असणार आहे. स्पर्धेचा ग्रँड फिनाले सोहळा ३१ मे रोजी हायटेक्स (HITEX) एक्झिबिशन सेंटर येथे होणार आहे. तर १० मे रोजी गचीबोवली इनडोअर स्टेडियममध्ये याचा उद्घाटन सोहळा होणार आहे. उद्घाटन सोहळा अतिशय भव्य होणार असून यासाठी खास पारंपारिक लोक आणि आदिवासी नृत्य सादर केले जाणार आहेत.

Kkhushi Niramish

Miss World 2025 ची स्पर्धा यंदा तेलंगणा येथे पार पडणार आहे. ही ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा असणार आहे. स्पर्धेचा ग्रँड फिनाले सोहळा ३१ मे रोजी हायटेक्स (HITEX) एक्झिबिशन सेंटर येथे होणार आहे. तर १० मे रोजी गचीबोवली इनडोअर स्टेडियममध्ये याचा उद्घाटन सोहळा होणार आहे. यासाठी स्पर्धक ६ आणि ७ तारखेपासून उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळा अतिशय भव्य होणार असून यासाठी खास पारंपारिक लोक आणि आदिवासी नृत्य सादर केले जाणार आहेत. याशिवाय सुफी आणि कव्वाली संगीताची मेहफिल देखील सजणार आहे.

हेरिटेज वॉक

स्पर्धेत १४० देशांच्या सौंदर्यवती सहभागी होत आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर स्पर्धकांसाठी हैदराबाद हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बौद्ध थीम पार्क, काकतिया हेरिटेज, रामप्पा मंदिर, चार मिनार, यदगिरीगुत्ता मंदिर इत्यादींचा समावेश आहे. हा हेरिटेज वॉक १२ ते १६ या वेगवेगळ्या तारखांदरम्यान आयोजित केला जाणार आहे. याशिवाय हातमाग केंद्रांना भेट, रुग्णालयांना देखील भेट देण्यात येणार आहे. याच दरम्यान स्पर्धकांसाठी वेलकम डिनर देखील आयोजित करण्यात आले आहे. ही मेजवानी अत्यंत संस्मरणीय ठरणार आहे.

तेलंगणाची वैभवशाली संस्कृती जगासमोर मांडण्याची संधी

तेलंगणा येथे आयोजित केलेली ही केवळ एक सौंदर्य स्पर्धा नाही तर तेलंगणाचे सौंदर्य, तिचे आदरातिथ्य आणि तिची अनोखी संस्कृती संपूर्ण जगासमोर दाखवण्याची संधी आहे. तेलंगणा संस्कृतीने समृद्ध आहे आणि पर्यटनासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. या ठिकाणचे जेवण, संगीत आणि इतिहासही तितकेच मनोरंजक आहेत.

पर्यटन सचिव स्मिता सभरवाल यांनी मंगळवारी चौमहल्ला पॅलेस येथे एक आढावा बैठक बोलावली, ज्यामध्ये तेलंगणा पर्यटन, ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (GHMC) आणि पोलिसांचे अधिकारी उपस्थित होते. या चर्चेत व्यवस्थांना अंतिम स्वरूप देणे आणि कार्यक्रमासाठी अखंड समन्वय सुनिश्चित करणे यावर भर देण्यात आला.

पर्यटन सचिव स्मिता सभरवाल यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की, ''प्रत्येक व्यवस्था इतकी भव्य असावी की तेलंगणा पर्यटन ब्रँडची ओळख प्रतिबिंबित होईल. या कार्यक्रमामुळे जागतिक स्तरावर राज्याची प्रतिमा बळकट होईल आणि पर्यटनाला एक नवा आयाम मिळेल,'' असे त्या म्हणाल्या.

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार