(सर्व फोटो सौ- फ्रीपीक)
फोटो

Parenting Tips : लहान मुलांना मोठं करताना पालकांनी घ्यावी 'या' गोष्टीची काळजी

Kkhushi Niramish
काळ बदलतो तसं आपल्याला मुलांचे संगोपन करताना स्वतःला सुद्धा बदलावं लागतं. मुलांचे चुकल्यावर त्यांना लगेच रागवणे किंवा चांगलं केल्यावर लगेच गिफ्ट देणे यापेक्षा अन्य प्रकारे मुलांना कसे समजून सांगता येईल यावर भर द्या. यासाठी या काही खास टिप्स- लहान मुलांना खाऊ घालणे हे अक्षरशः कर्मकठीण असते. मात्र, अशा वेळी त्यांच्या सोबत बसून एकत्र जेवण करणे जास्त योग्य असते. त्यांना जेवण करणे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहे हे पटवून द्यायला हवे. मग मुलं आनंदाने जेवतात.
तुमचे मूल तुम्हाला काय सांगत आहे हे नीट ऐकून घ्या. कारण हे महत्त्वाचे आहे. यामुळे आपले आई वडील आपलं ऐकतात, असा विश्वास निर्माण होतो आणि ते मनमोकळेपणाने बोलतात.
मुलांवर अजिबात रागवू नका. याचे तुमच्या नात्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. त्याऐवजी त्यांच्याशी सौम्य भाषेत संवाद साधा.
रागावण्याऐवजी तुमच्या मुलांना तुम्ही वेगवेगळे ऑप्शन द्या. तसेच तुम्हाला जो बदल त्यांच्यात हवा आहे तो पहिले स्वतःमध्ये करा. लहान मुलं तुम्हाला पाहून ते गुण आत्मसात करतील.
लहान मुलांची अभ्यासात रुची निर्माण होण्यासाठी त्यांच्यासोबत बसून त्यांचा अभ्यास घ्या. त्यांना नेमकी कोणती गोष्ट अवघड वाटत आहे ते समजून घ्या. ते तुम्हाला मोकळेपणाने हे सांगतील. त्यांना ज्या गोष्टी अवघड वाटतात त्या सोप्या करून सांगा. यामुळे अभ्यासात रुची निर्माण होईल.
लहान मुलांना स्वतःचे निर्णय घेता येत नाही. त्यामुळे तुम्ही निर्णय घेऊन त्यांच्यावर ते थेट लादण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ शाळेतील एखाद्या स्पर्धेत भाग घ्यायचा की नाही? अशा वेळी तुम्ही निर्णय घेण्याऐवजी त्यांना निर्णय कसा घ्यायचा याविषयी विचार करायला शिकवा. जेव्हा त्यांना निर्णय घेता येत नसेल तेव्हा तुम्ही स्वतः त्यांच्याबाबतीत निर्णय घ्या. मात्र, तो थेट लादू नका. त्याऐवजी तुम्ही त्यांच्यासाठी घेतलेला निर्णय योग्य आहे हे त्यांना समजून सांगा.
अभ्यासाचा कंटाळा आला असेल तर लहान मुलांना वेगवेगळ्या पझल गेम्सच्या माध्यमातून त्यांचे बुद्धी कौशल्य वाढवण्यावर भर द्या.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती