Mumbai : कलाप्रेमींसाठी पर्वणी! पाहा 'काळा घोडा आर्ट अव्हेन्यू'ची खास झलक (All Photos - X)
फोटो

Mumbai : कलाप्रेमींसाठी पर्वणी! पाहा 'काळा घोडा आर्ट अव्हेन्यू'ची खास झलक

विद्यमान वास्तुरचनेशी सुसंगत राहील अशा पद्धतीने संपूर्ण परिसर विकसित करण्यात आला असून, नागरिकांसाठी एक उत्कृष्ट सार्वजनिक जागा तयार झाली आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबईच्या ऐतिहासिक 'काळा घोडा' परिसराला आता नव्या रूपात अनुभवण्याची संधी मिळणार आहे. वारसा लाभलेल्या रस्त्यांचे सुशोभीकरण करून साकारण्यात आलेल्या 'काळा घोडा आर्ट अव्हेन्यू'मुळे शहराला पहिला पादचारी आर्ट प्लाझा मिळाला आहे.

आकर्षक भित्तीचित्रे, कलात्मक शिल्पे, प्रशस्त पदपथ आणि मनमोहक वातावरणाने सजलेल्या या नव्या आर्ट हबची खास झलक पाहा.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या प्रकल्पाअंतर्गत व्ही. बी. गांधी मार्ग (फोर्ब्स स्ट्रीट), रोपवॉक लेन, साईबाबा रोड, रुदरफोर्ड स्ट्रीट आणि बी. भरुचा रोड या वारसा लाभलेल्या पाच रस्त्यांचे पादचारी-अनुकूल परिसरात रूपांतर करण्यात आले आहे.

दर शनिवारी आणि रविवारी सायंकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत या रस्त्यांवर वाहनांना प्रवेश बंद राहणार असून, नागरिक आणि पर्यटकांना या परिसराचा पायी फेरफटका मारता येणार आहे.

प्रकल्पाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, स्थानिक नगरसेवक मकरंद नार्वेकर, हर्षिता नार्वेकर आणि बीएमसीचे अभिनंदन केले.

हा प्रकल्प संकल्पनेपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले.

“आपल्या शहराला एक नवा कलात्मक विभाग मिळाला आहे. येथे सुंदर पदपथ आणि सार्वजनिक जागा निर्माण करण्यात आल्या आहेत. विद्यमान वास्तुरचनेशी सुसंगत राहील अशा पद्धतीने संपूर्ण परिसर विकसित करण्यात आला असून, नागरिकांसाठी एक उत्कृष्ट सार्वजनिक जागा तयार झाली आहे,” असे ते म्हणाले.

या नव्याने विकसित करण्यात आलेल्या परिसराचे जतन करण्यासाठी नागरिक आणि स्थानिक व्यावसायिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. या प्रकल्पाच्या दीर्घकालीन यशासाठी त्यांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

ग्लासगो येथील ब्युकेनन स्ट्रीट आणि लंडनमधील कार्नाबी स्ट्रीट यांच्या धर्तीवर विकसित करण्यात आलेल्या ‘काळा घोडा आर्ट अव्हेन्यू’मध्ये दगडी फरशीचे पदपथ, रंगीबेरंगी भित्तीचित्रे, कलात्मक स्ट्रीट इन्स्टॉलेशन्स आणि सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या कलाकारांनी तयार केलेली चार शिल्पे उभारण्यात आली आहेत.

याशिवाय येथे खुल्या वातावरणातील भोजनव्यवस्था (अल फ्रेस्को डायनिंग) सुरू करण्याची तसेच नियमितपणे कला, हस्तकला आणि संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्याचीही योजना आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा समावेश; सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारची माहिती

Nashik : पर्यटक महिलेची छेड काढल्याचा जाब विचारताच कुटुंबावर हल्ला; पाठलाग करत कारची तोडफोड, VIDEO

Thane : 'अनधिकृत होर्डिंग्ज हटवा'; बॅनर दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

'गाडी थांबवली असती तर…'; धावत्या ट्रेनमध्ये महिलेचा मृत्यू; वैद्यकीय मदत वेळेत न मिळाल्याचा सहप्रवाशाचा आरोप, VIDEO

इराणचा UAE च्या दोन जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ला; एका भारतीय खलाशाचा मृत्यू, आठ जण जखमी