फोटो

Pulwama Attack : १४ फेब्रुवारी... 'काळा दिवस'; देश कधीच विसरू शकत नाही अशी आठवण

१४ फेब्रुवारी हा दिवस जगभर प्रेमदिन म्हणून ओळखला जातो, पण भारतासाठी हा दिवस वेदनादायी आठवणींचा आहे.

Mayuri Gawade

१४ फेब्रुवारी हा दिवस जगभर प्रेमदिन म्हणून ओळखला जातो, पण भारतासाठी हा दिवस वेदनादायी आठवणींचा आहे.

२०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाले आणि संपूर्ण देश शोकसागरात बुडाला.

त्या दिवशी जम्मू-काश्मीर महामार्गावरून सीआरपीएफच्या ताफ्यात सुमारे २५०० जवान श्रीनगरकडे निघाले होते.

अवंतीपोरा येथील लेथपोरा परिसरात कारमध्ये भरलेले स्फोटके बसला धडकली आणि भीषण स्फोट झाला.

आवाज अनेक किलोमीटर दूर ऐकू आला आणि परिसर धुराने झाकला गेला.

या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, अनेक कुटुंबांचा आधार हिरावला गेला.

या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घेतली.

भारताने २६ फेब्रुवारीला पाकिस्तानातील बालाकोटमध्ये हवाई कारवाई केली, ज्याला ‘बालाकोट एअर स्ट्राइक’ म्हणतात.

या दिवशी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून त्यांचे बलिदान स्मरण केले जाते.

म्हणून भारतात १४ फेब्रुवारीला ‘काळा दिवस’ म्हणून स्मरण केले जाते.

दिल्लीत ५ मजली PG इमारत जमीनदोस्त; एकाचा मृत्यू, अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

VIDEO : जखमी गोविंदांच्या उपचारावरून पालघरच्या रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण; शिवसेना आमदार पुत्रासह १७ जणांवर गुन्हा

जन्माष्टमीच्या रात्री संतापजनक प्रकार! मंदिरात जात असलेल्या १४ वर्षीय मुलीचं अपहरण अन्...

Mumbai : गणेशभक्तांना दिलासा; मध्यरात्रीपर्यंत धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, जाणून घ्या वेळ

Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल