देवशयनी एकादशीच्या सोहळ्यासाठी सुमारे पंधरा ते सतरा लाख वैष्णव भाविकांनी पंढरपूरला हजेरी लावली. पण फक्त पंढरपूरच नाही तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाविकांचा उत्साह बघायला मिळाला. Photo Credit: Darshan Kadam
फोटो

Ashadhi Ekadashi 2024: अवघा रंग एक झाला!! संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरी झाली आषाढी एकादशी

Tejashree Gaikwad
हरिनामाचा गजर अन् टाळ-मृदुंगाच्या निनादात अवघी पंढरी नगरी दुमदुमली असून पंढरीच्या चंद्रभागा वाळवंटासह प्रदक्षिणा मार्ग आणि भक्ती मार्गावर हातात वैष्णवांची पताका घेऊन वारकरी भाविक हरिनामाचा गजर करीत आहेत.
जेव्हा नव्हते चराचरा तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा, गंगा तेव्हा होती चंद्रभागा’ असे अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या चंद्रभागेच्या तिरी आषाढी देवशयनी एकादशीच्या सोहळ्यासाठी लाखो वैष्णवांचा मेळा चंद्रभागेच्या तिरी दाखल झाला.
स्वामी सामाजिक संस्था च्या वतीने, स्वामी समर्थ मंदिर, सेंट्रल रेल्वे वर्कशॉप ते विठ्ठल रुक्मिणी मदीर, परेल, पर्यंत वारकरी दिड्डी काढण्यात आली होती.
यामध्ये हरिनामाचा, विठ्ठल लाचा गजर करत सर्व स्वामी संस्थेचे सभासद वारकरी सहभागी झाले होते, वातावरण अगदी भक्तिमय व मन प्रसन्न करणारे झाले होते, विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन दिडीची सांगता करण्यात आली.
मुंबई येथील ४०० वर्ष जुन्या प्रति पंढरपूर मंदिराला अनेक हजारो भाविकांनी हजेरी लावली.
दरवर्षीप्रमाणे वडाळ्यात मुंबई आणि उपनगरातून भाविक जमले होते. वेगवेगळ्या कार्यक्रमासह उत्सव पार पडला.
फक्त मंदिरच नाही तर मुंबईतील रेल्वे स्टेशनवरही अनेक वारकरी दिंडी घेऊन आलेले दिसले.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?