(सर्व फोटो - शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)
फोटो

आईची साडी, जुन्या आठवणी अन् शिवानी रांगोळेचा मोहक लूक; पाहा खास फोटो

आईची साडी, जुन्या आठवणी अन् शिवानी रांगोळेचा मोहक लूक; पाहा खास फोटो

किशोरी घायवट-उबाळे

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमधून तिच्या आईसोबतचे सुंदर नाते आणि जुन्या आठवणींची खास झलक पाहायला मिळते. शिवानीने आपल्या आईची वर्षानुवर्षे जपून ठेवलेली साडी नेसून फोटोशूट केले आहे.

आईची साडी नेसून साकारला पारंपरिक लूक

शिवानीने हिरव्या आणि पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. या साडीवर तिने सोनेरी रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.

गळ्यात पारंपरिक ठुशीसारखा सोनेरी हार, कानात मॅचिंग झुमके आणि कपाळावर छोटी टिकली असा तिचा लूक आहे. या पारंपरिक लूकमध्ये शिवानी अतिशय सुंदर दिसत आहे.

बालपणीचा फोटोही केला शेअर

शिवानीने तिच्या बालपणीचा एक जुना कौटुंबिक फोटोही शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने आईची साडी नेसलेले तिचे सध्याचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यामुळे जुन्या आठवणी आणि वर्तमानातील क्षण यांचा सुंदर मेळ पाहायला मिळतो.

'माझ्या बारशाला आईने नेसलेली ही साडी...'

या फोटोंसोबत शिवानीने लिहिलेल्या कॅप्शनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

"माझ्या बारशाला आईने नेसलेली ही साडी काल मी नेसले!! इतकी वर्षं ती आहे तशीच टवटवीत आहे, साडी आणि आई दोन्ही," असे तिने म्हटले आहे.

चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

आईची साडी आणि त्यामागच्या आठवणी यामुळे शिवानीची ही पोस्ट चाहत्यांसाठीही खास ठरली आहे. आई-मुलीच्या नात्यातील प्रेम आणि साडीशी जोडलेल्या भावनिक आठवणी पाहून चाहत्यांनी पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

तिच्या पारंपरिक लूकचेही अनेकांनी कौतुक केले आहे.

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती