अनेकांना एकट्याने प्रवास करायला आवडते. हा केवळ छंदच नाही तर याचा मानसिक आरोग्यालाही फायदा होऊ शकतो. Freepik
फोटो

Travel Tips: सोलो ट्रिप करायची आहे? 'ही' भारतातील ठिकाणं आहेत बेस्ट, आजच करा प्लॅन

जर तुम्हाला एकट्याने प्रवास करायचा असेल, तर तुम्ही आपल्या देशातील या सुंदर ठिकाणी एकट्याने जाऊ शकता. या ठकाणी तुम्हाला निसर्गाचे सुंदर नजारे पाहायला मिळतील.

Tejashree Gaikwad
तुमच्या व्यस्त जीवनशैलीतील ताणतणावापासून मुक्त होण्यासही तुम्ही सुद्धा सोलो ट्रिपला जायचा प्लॅन करत असल्यास आम्ही तुम्हाला वेगेवेगळ्या ठिकाणांची माहिती देणार आहोत.
ऋषिकेश आणि हरिद्वार ही सोलो ट्रिपसाठी उत्तम ठिकाणे आहेत. गंगेच्या काठावर बसून निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटता येतो. विशेषतः ज्यांना शांत ठिकाणी जायचे आहे त्यांच्यासाठी ही जागा बेस्ट आहे.
तुम्ही येथे गंगा आरती पाहण्यासाठी जाऊ शकता. यासोबतच तुम्ही नीलकंठ महादेव मंदिर, भारत मंदिर, त्रिवेणी घाट, लक्ष्मण झुला, वशिष्ठ गुंफा आणि इतर अनेक ठिकाणी भेट देऊ शकता.
जर तुम्हाला इतिहास जाणून घेण्यात रस असेल तर उदयपूरला भेट देऊ शकता. उदयपूरमध्ये अनेक तलाव आहेत जिथे तुम्ही फिरायला जाऊ शकता. येथे तुम्ही जग मंदिर, सिटी पॅलेस आणि दूध तलाईला भेट देऊ शकता.
याशिवाय तुम्ही मोती महल, दिलकुश महल, फतेल प्रकाश पॅलेस आणि शीश महलला भेट देऊ शकता.
केरळ हे सोलो ट्रीपसाठी अतिशय सुंदर ठिकाण आहे. तुम्ही कोवलम येथे जाऊ शकता. येथे तुम्हाला हाऊसबोट चालवण्याची आणि वॉटर स्पोर्ट्स पाहण्याची संधी मिळेल.
तुम्ही केरळमधील तिरुअनंतपुरमच्या किनारी शहर, कोची, अलाप्पुझा, कुट्टनाड, मुझाप्पिलंगड समुद्रकिनारा, बोलगट्टी बेट आणि मुन्नार यासारख्या ठिकाणांना देखील भेट देऊ शकता.

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप