मुलाच्या नामकरण सोहळ्यात सोनम कपूरचा एलिगंट लूक; पाहा Photos  (Photo-Instagram)
फोटो

मुलाच्या नामकरण सोहळ्यात सोनम कपूरचा एलिगंट लूक; पाहा Photos

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या कौटुंबिक फोटोंमध्ये त्यांनी आपल्या मुलाचे नाव 'रुद्रलोक कपूर आहुजा' असल्याचे जाहीर केले.

किशोरी घायवट-उबाळे

रविवारी (दि.१०) रोजी सोनम कपूर आहुजा आणि आनंद आहुजा यांनी आपल्या दुसऱ्या मुलाची अधिकृत ओळख जगासमोर करून दिली. नामकरण सोहळ्यातील खास फोटो शेअर करत या जोडप्याने मुलाचे नाव, त्यामागील आध्यात्मिक अर्थ आणि कुटुंबाचा सुंदर फॅशन लूक चाहत्यांसोबत शेअर केला.

सोनम आणि आनंदच्या दुसऱ्या मुलाचे नाव 'रुद्रलोक'

२९ मार्च रोजी सोनमने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर रविवारी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या कौटुंबिक फोटोंमध्ये त्यांनी आपल्या मुलाचे नाव 'रुद्रलोक कपूर आहुजा' असल्याचे जाहीर केले.

या जोडप्याने आपल्या पोस्टमध्ये मुलाच्या जन्माला आध्यात्मिक महत्त्व असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या मते, एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने जन्मलेल्या रुद्रलोकचा जन्म हा मोठा मुलगा वायू कपूर आहुजासोबत "दैवी जोडी" असल्यासारखा वाटतो.

नामकरण सोहळ्यातील खास फॅशन लूक

या खास कौटुंबिक समारंभाला सोनम कपूरने स्टायलिश फॅशन मोमेंटमध्ये बदलले. संपूर्ण कपूर-आहुजा कुटुंबाने अनामिका खन्नाच्या आयव्हरी आणि पिस्ता रंगातील समन्वय साधलेल्या पोशाखांची निवड केली होती.

सोनमचा एलिगंट लूक चर्चेत

सोनमने पिस्ता रंगाचा फ्लोईंग लेहेंगा परिधान केला होता. त्यासोबत ट्युनिक-स्टाइल कुर्ता आणि मॅचिंग दुपट्ट्याची जोड दिली होती. या ड्रेसवर हलक्या लव्हेंडर, निळ्या रंगातील फ्लोरल एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती.

रिया कपूरची स्टायलिंग

रिया कपूर, मनीषा मेलवानी आणि अभिलाषा देवनानी यांनी सोनमचे स्टायलिंग केले होते. सोनमने ग्लोईंग स्किन, पर्ल ड्रॉप ज्वेलरी आणि निळ्या हायड्रेंजियाने सजवलेला स्लीक बन असा साधा पण आकर्षक लूक ठेवला होता.

आनंद आणि मुलांचे ट्विनिंग लूक

आनंद आहुजाने आयव्हरी रंगातील साधा कुर्ता-पायजमा परिधान केला होता. तर वायू आणि रुद्रलोक सेज-ग्रीन आणि आयव्हरी रंगातील एथनिक पोशाखांमध्ये अतिशय गोंडस दिसत होते.

'रुद्रलोख' नावामागील खास अर्थ

सोनम आणि आनंद यांनी आपल्या मुलाच्या नावामागील आध्यात्मिक आणि वैदिक अर्थही स्पष्ट केला. त्यांनी लिहिले की, वेदांमध्ये "रुद्र" हा शब्द संस्कृतमधील 'रुद' या धातूपासून आला असून त्याचा अर्थ "गर्जना करणे" असा होतो. हे नाव शक्ती, उपचार, नवचैतन्य आणि परिवर्तनाचे प्रतीक मानले जाते.

"सर्व शक्तींमध्ये सर्वात शक्तिशाली"

पोस्टमध्ये त्यांनी पुढे म्हटले की, रुद्र म्हणजे "सर्व शक्तींमध्ये सर्वात शक्तिशाली" आणि "वादळ, श्वास, उपचार आणि नवजीवन यामागील दैवी शक्ती." त्यांनी मोठा मुलगा वायू कपूर आहुजाशीही या नावाचा संबंध जोडत सांगितले की, वायू म्हणजे प्राणशक्ती आणि रुद्र यांच्यात खोल आध्यात्मिक नाते आहे.

मुलासाठी खास शुभेच्छा

पोस्टच्या शेवटी त्यांनी आपल्या मुलासाठी खास शुभेच्छाही दिल्या. "त्याच्या नावाप्रमाणेच रुद्र निर्भय, दयाळू, जागरूक आणि शक्ती व प्रकाशाचा स्रोत बनो," असे त्यांनी लिहिले आहे. सोनम आणि आनंद यांच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा अडचणीत; जळीत नोटांप्रकरणातील आरोप सिद्ध, संसदीय चौकशी समितीचा अहवाल

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग