फोटो

घशात खवखव आणि गिळताना त्रास होतोय? 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

घशात खवखव आणि गिळताना त्रास होतोय? 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

किशोरी घायवट-उबाळे
घसा दुखणे, खवखव, कोरडेपणा किंवा गिळताना त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
दिवसातून २-३ वेळा कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने घशाला आराम मिळतो.
एक चमचा मधात थोडा आल्याचा रस मिसळून घेतल्यास घशातील खवखव कमी होण्यास मदत होते.
दिवसभर कोमट किंवा गरम पाणी प्यायल्याने घसा ओलसर राहतो आणि जळजळ कमी होते.
रात्री झोपण्यापूर्वी हळद घातलेले कोमट दूध प्यायल्याने घशाला आराम मिळू शकतो.
गरम पाण्याची वाफ घेतल्याने घशातील आणि नाकातील कोंडलेपणा कमी होण्यास मदत होते.
घसा दुखत असताना थंड पाणी, आईस्क्रीम आणि थंड पेये टाळणे फायदेशीर ठरते.
घसा दुखणे ३-४ दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी