Freepik
फोटो

Copper Utensils : तांब्याच्या भांड्यांचा स्वयंपाक घरातील उपयोगाने आरोग्याला होतील आश्चर्यकारक फायदे

Kkhushi Niramish
तांब्याच्या भांड्याचा उपयोग खूप पूर्वापार चालत आला आहे. फक्त तांब्याच्या बाटलीत पाणी पिण्यासाठीच नव्हे तर तांब्याच्या स्वयंपाकासाठी तांब्याच्या भांड्याचा उपयोग केल्याने त्याचे आरोग्याला खूप आश्चर्यकारक फायदे होतात.
तांब्याच्या भांड्यात स्वयंपाक केल्याने गृहिणींना त्याचा मोठा फायदा होतो. तांब्याची भांडी लवकर तापतात तसेच एकसारखी तापतात. त्यामुळे कमी आणि मध्यम आचेवर हळूवार पणे स्वयंपाक करा यामुळे अन्न जळण्याची शक्यता कमी असते.
मध्यम आणि हलक्या आचेवर अन्न शिजवल्यामुळे अन्न रुचकर लागते. तसेच यामध्ये पौष्टिक तत्वांचा ऱ्हास होत नाही. पौष्टिक तत्वांचा ऱ्हास न झाल्याने हे आरोग्याला उत्तम फायदे देतात. सर्वोत्तम फायदे हे अन्न पचनासबंधी होतात. पचनाची समस्या दूर झाल्याने पोटाचे आजार दूर होतात. जसेच की बद्धकोष्ठता, अपचन होणे, अजीर्ण होणे.
तांब्याच्या भांड्यातील स्वयंपाकातील वापरामुळे अन्न अधिक पौष्टिक होते. हे अन्न शरीराला विषमुक्त ठेवते आणि हिमोग्लोबीन वाढवण्यासही मदत करते, असे अभ्यासक सांगतात.
तांब्याच्या भांड्यातील स्वयंपाकातील वापरामुळे पित्त स्राव सुधारते आणि पचनास मदत करण्यासाठी आतड्यांच्या पेरिस्टाल्टिक हालचाली सुधारते.
तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचेही आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी, आयुर्वेदाने अनेक आजारांवर अंतिम उपाय म्हणून सांगितले आहे.
तांब्याच्या बाटलीत पाणी पिण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तांब्याच्या बाटलीतील पाणी पिण्याने हायड्रेशन आणि निरोगीपणा वाढतो. याशिवाय तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स नाहीसे होतात.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती