आपल्या लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवणे खूप महत्त्वाचे आहे त्यासाठी आपण त्यांच्याकडून विविध प्रकारचे टास्क करून घेऊ शकतो, किंवा त्यांना आवडणारे काहीतरी त्यांच्याकडून करून घेऊ शकतो. यासाठी पुढील माहिती वाचा.वाचनाची सवय लावा : मुलांना रोज काहीतरी वाचण्याची सवय लावा. वाचन त्यांच्या स्मृतीला चालना देते आणि त्यांना नवीन गोष्टी शिकायला मदत होते.स्मरणशक्तीचा व्यायाम :
मुलांना वेगवेगळ्या गोष्टीं आठवण करून सांगितल्या जाऊ शकतात. उदा, एक वाक्य सांगा आणि त्याचे तीन किंवा चार भाग सांगून त्यांना ते पुन्हा बोलायला सांगा.सकारात्मक वातावरण तयार करा : घरात सकारात्मक आणि शांत वातावरण ठेवा. तणाव कमी असेल तर मुलांचे लक्ष आणि स्मरणशक्ती उत्तम राहते.
मुलांना त्यांच्या मित्रांशी किंवा कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधण्याची संधी द्या. विविध विषयांवर चर्चा केल्याने त्यांची स्मृती आणि विचारशक्ती सुधारते.स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खेळ : कॉर्नर टू कॉर्नर किंवा पझल सारखे खेळ मुलांची स्मृती वाढवतात. हे खेळ मुलांच्या लक्ष आणि एकाग्रतेला चालना देतात.मुलांना निसर्गामध्ये फिरायला घेऊन जा आणि त्यांनी पाहिलेल्या गोष्टींचे वर्णन करण्यास सांगा. यामुळे त्यांची निरीक्षणशक्ती वाढते आणि स्मरणशक्तीही सुधारते.
मुलांना दररोज काय शिकवाल त्याचे पुनरावलोकन करण्यास सांगा. यामुळे नवीन गोष्टी आठवण्याची क्षमता वाढते आणि माहिती दीर्घकाळ लक्षात राहते.संगीत : मुलांना संगीत ऐकायला द्या. संगीत शारिरीक आणि मानसिक ताण कमी करते आणि मेंदूला सक्रिय ठेवते, ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते.