All Photo - Hebbars Kitchen - You Tube
फोटो

Chaitra Navratri 2025 : मऊ आणि लुसलुशीत साबुदाणा खिचडी कशी करावी? 'या' छोट्या टिप्स फॉलो करा

Kkhushi Niramish
साबुदाण्याची खिचडी मऊ लुसलुशीत होण्यासाठी सर्वप्रथम साबुदाण्यात योग्य प्रमाणात पाणी घाला.
आता या पाण्यात हाताने रब करून साबुदाण्यावरील अतिरक्त स्टार्च काढून घ्या. नंतर या पाण्यातून साबुदाणा वेगळा करा.
साबुदाण्याची खिचडी चांगली मऊ होण्यासाठी साबुदाणा चांगला भिजणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी साबुदाण्यात घाला. किमान पाच तास साबुदाणा भिजत ठेवा.
साबुदाणा चांगला भिजला की नाही हे तपासून पाहा.
साबुदाणा चांगला भिजला असेल तर बोटांनी प्रेस करताच तो प्रेस होईल आणि मऊ वाटेल.
शेंगदाणे बदामी रंगापर्यंत पॅनमध्ये भाजून घ्या.
दाण्याचे कूट तयार करताना हे थोडे जाडसर ठेवा.
साबुदाण्यात दाण्याचे कूट मिक्स करून मिश्रण एकजीव करून घ्या.
नंतर पॅनमध्ये तूप घालून त्यामध्ये जिरे, मिरची, कढीपत्ता याची छान फोडणी द्या.
फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये बटाट्याचे बारीक तुकडे घाला आणि ते बदामी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या.
बटाटे बदामी रंगाचे झाल्यानंतर त्यात साबुदाणा आणि शेंगदाण्याचे मिश्रण घाला. सर्व मिश्रण छान भाजून घ्या. चवीनुसार मीठ घाला.
सरते शेवटी तयार झालेल्या साबुदाणा खिचडीत अर्धा लिंबू पिळा. यामुळे खिचडी फार जास्त ऑइली वाटणार नाही.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत