Tasteatlas/Facebook
फोटो

Best Dishes: जगातील १०० सर्वोत्तम खाद्यपदार्थ, बघा कोणत्या आहेत टॉप १० डिशेस

Tejashree Gaikwad
टेस्ट ॲटलस या ऑनलाइन फूड रँकिंग पेजने या वर्षी गुरुवारी (१८ जुलै) जगातील १०० सर्वोत्कृष्ट पदार्थांची यादी प्रसिद्ध केली आहे.
जगभरातील या यादीत भारतीय खाद्यपदार्थ पुन्हा एकदा यादीत आपले स्थान मिळवण्यात यशस्वी झाले.
टॉप ५० मध्ये, भारतातील बटर गार्लिक नान, टिक्का आणि तंदूरीला टेस्ट ॲटलसने जगातील सर्वोत्तम पदार्थ म्हणून स्थान दिले आहे.
पिकान्हा हा ब्राझीलचा नॉन व्हेज पदार्थ या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
रोटी कॅनई या खाद्यपदार्थाला दुसऱ्या नंबर वर स्थान मिळाले आहे. हा मलेशियाचा पदार्थ आहे.
फाट काफ्राव थायलंडमधील सर्वात लोकप्रिय पदार्थ आहे. या डिशने त्याच्या मोहक स्वरूप आणि चवसाठी प्रतिष्ठा मिळविली आहे.
इटलीचा पिझ्झा हा जग प्रसिद्ध आहे. पिझ्झा नेपोलेताना हा इटलीचा खाद्यपदार्थ यादीत ४थ्या नंबरवर आहे.
मोमोजसारखी दिसणारी चीनची गुओटी ही डिश पाचव्या स्थानी आहे.
थायलंडचे खाओ सोई हे नूडल सूप आहे. याने सहावा नंबर पटकावला आहे.
बटर गार्लिक नान हा भारतीय ब्रेडचा (चपातीचा) एक लोकप्रिय प्रकार आहे. आपल्या भारताच्या या डिशने सातवा नंबर लावला आहे.
उकडीच्या मोदकाप्रमाणे दिसणारी ही डिश तांगबाओ अशा नावाने ओळखली जाते. ही चीनची डिश आहे जिने आठवा नंबर मिळवला आहे.
काबाबसारखी दिसणारी ही डिश आहे रशियाची शशलिक. या डिशला नववे स्थान मिळाले आहे.
फानेंग करी ही थायलंडची नॉनव्हेज करी आहे. या डिशने यादीत दहावे स्थान मिळवले आहे.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था