झटपट मूग डाळ हलवा बनवण्यासाठी साहित्य :
मुगाची डाळ १ कप
साखर १ कप
तुप १/२ कप
दूध १.५ कप
पाणी १/२ कप
वेलची पूड १/२ टी स्पून
सूका मेवा
केशरमूग डाळ हलवा दूधाचा आणि दूधाशिवायही बनवता येतो. तुम्हाला दूध टाकून हलवा बनवायचा असेल तर एक ग्लास दूध आवश्यक आहे. सर्व प्रथम मूग डाळ व्यवस्थित धुवून नंतर जाळीत निथळून घ्या. आता ही डाळ पॅनमध्ये किंवा कढईत चांगली भाजून घ्या. भाजलेली मूग डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. ही पावडर तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता. आता पॅन किंवा कढईत तूप टाकून ते गरम करून घ्यातुपात बारीक केलेली मूग डाळ चांगली भाजून घ्या. मूग डाळ चांगली भाजल्यानंतर तुम्हाला जर दूधात बनवलेला हलवा आवडत असेल तर एक ग्लास दूध यामध्ये ॲड करा अथवा एक ग्लास पाणी ॲड करा आणि पुन्हा भाजून घ्या. वरील मिश्रण चांगले भाजल्यानंतर त्यात सूका मेवा, वेलची पूड आणि केसर मिक्स करून पुन्हा थोडा वेळ भाजासंपूर्ण मिश्रण एकजीव होईपर्यंत छान बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्या. स्वादिष्ट मूग डाळ हलवा तयार आहे.