'बिग बॅास'मध्ये कल्ला करायला महाराष्ट्रातील कीर्तनकार ते टीव्ही कलाकार असे वेगवेगळे स्पर्धक येत आहेत. 'बिग बॉस'च्या घरात एकूण १६ स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे.  
फोटो

Bigg Boss Marathi 5: छोटा पुढारी ते निक्की तांबोळी, 'क्यूके' अन् 'डीपी'चीही एंट्री; यंदा बिग बॉस मराठीच्या घरात 'हे' १६ स्पर्धक करणार कल्ला!

Tejashree Gaikwad
अवघ्या महाराष्ट्राचाच नाहीतर जगभरातील मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत असलेला 'लय भारी' स्टार रितेश देशमुख यंदाच्या सीजनचे होस्टिंग करताना दिसणार आहे.
बिग बॉस मराठीचा पहिला स्पर्धक आहे वर्षा उसगांवकर. स्टेजवर ड्रीम गर्ल वर्षा उसगांवकर यांच्या अदांनी झाले सारे फिदा झाले.
‘रमा-राघव’ फेम निखिल दामले या या अभिनेत्यानेही बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेतली आहे.
प्रसिद्ध युटूबर कोकण हार्डटेड गर्ल अर्थात अंकिता प्रभू वालावलकर ही सुद्धा बिग बॉस मराठीच्या या सिजनमध्ये एन्ट्री घेतली आहे.
प्रसिद्ध मराठी कॉमेडी अभिनेता पंढरीनाथ कांबळे अर्थात पॅड्डीने एन्ट्री घेतली आहे. बिग बॉस मराठीच्या घरात आता पंढरीनाथ कांबळे यांच्या पंचेसची जादू होणार आहे.
अभिनेत्री योगिता चव्हाणने सिझलिंग डान्स परफॉर्मन्स सोबत बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेतली आहे.
नायकांचे राज्य संपणार, खलनायिका बनून जान्हवी किल्लेकर जायंट किलर बनणार. 'भाग्य दिले तू मला’ फेम खलनायिका जान्हवी किल्लेकरही यंदाची स्पर्धकी आहे.
आपल्या गाण्यांनी संपूर्ण तरुणाईला वेड लावणारा पहिला इंडियन आयडॉल अभिजित सावंतनेही बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेतली आहे.
छोटे पुढारी घन:श्याम दरवडे हे सुद्धा यंदाच्या सिजनमध्ये दिसणार आहेत.
परदेसी गर्ल इरिना रूडाकोवा इंटरनॅशनल स्टाईलने कल्ला करण्यासाठी बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेतली आहे.
हिंदी 'बिग बॉस' मध्ये भाग घेतलेली मुंबई, डोंबिवलीची धाकड गर्ल 'निक्की तांबोळी'ने आता बिग बॉस मराठीमध्ये एन्ट्री घेतली आहे.
बारामतीचा रांगडा गडी अभिनेता वैभव चव्हाण यानेही बिग बॉस मराठीच्या घरात धम्माल करायला एन्ट्री केली आहे.
अमरावतीची रॅपर गर्ल आणि हसल मधून घराघरात पोहचलेली आर्या जाधव अर्थात क्यूके चक्क रितेश देशमुखसाठी खास रॅप लिहून तो मंचावर सादर करून घरात एन्ट्री घेतली आहे.
महाराष्ट्राचे लाडके किर्तनकार पुरूषोत्तमदादा पाटील यांचा बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश.
घरी आई अन् बायकोच्या आदेशाबाहेर न जाणारे प्रसिद्ध युटूबर धनंजय पोवार हे सुद्धा बिग बॉसच्या घरात यंदा दिसणार आहेत.
गुलीगत धोका या रिल्सने फेमस झालेला सूरज चव्हाणही बिग बॉसच्या घरात पोहचला आहे.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला