राजकीय

उत्तर प्रदेशात उतरवले १ लाख भोंगे

प्रतिनिधी

आतापर्यंत उत्तर प्रदेशात सुमारे १ लाख भोंगे उतरवण्यात आले आहेत. तसेच रस्त्यावरील नमाजही बंद करण्यात आले आहेत, असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी केला.

ते म्हणाले की, ‘आमच्या सरकारने भोंग्याचे प्रकरण चांगल्या प्रकारे हाताळले आहे. उत्तर प्रदेशातील विविध धार्मिक स्थळांवरून आतापर्यंत सुमारे १ लाख भोंगे हटवण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात भोंगे हटवल्यामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशात ध्वनीप्रदूषण कमी झाले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भोंगे हटवताना कुठेही वाद झाला नाही. यूपी पोलीस सातत्याने भोंग्यांविरोधात मोहीम राबवत आहेत.’

‘आम्ही केवळ लाऊडस्पीकरचा प्रश्न सोडवला नाही तर रस्त्यावरील नमाज पठण करण्याचा प्रश्नही सोडवला आहे. रस्त्यावर नमाज अदा करू नये, असे सक्त आदेश आम्ही दिले होते. आता रस्त्यावर कुणीही नमाज अदा करत नाही. यूपीमध्ये मुस्लिमांची संख्या २५ कोटींच्या आसपास आहे. असे असूनही ईदच्या दिवशी देखील कुठेही रस्त्यावर नमाज अदा करण्यात आली नाही. रस्ते हे वाहतुकीसाठी असतात. लोक स्वतःही पुढे येऊन रस्त्यांऐवजी घरांत किंवा मशिदीत नमाज अदा करून नवीन आदेशाचे पालन करत आहेत,’ असा दावाही योगींनी केला.

मतदारच डिलीट केले! राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर आरोप

मराठा समाजाला मोठा दिलासा! हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली

मालेगाव बॉम्बस्फोटातील निर्दोष सुटलेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस

एकनाथ शिंदे अडचणीत; बेकायदा इमारतींना अभय दिल्याचा आरोप, उच्च न्यायालयात याचिका दाखल

...म्हणून मला मोदींना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही! पंच्याहत्तरीनंतरही सक्रिय असलेल्या शरद पवारांचे वक्तव्य