राजकीय

डोवाल व मिश्रा यांना पुन्हा मुदतवाढ

केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर अजित डोवाल यांना तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून पी. के. मिश्रा यांना कायम ठेवण्यात आले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर अजित डोवाल यांना तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून पी. के. मिश्रा यांना कायम ठेवण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने डोवाल व मिश्रा यांच्या पुनर्नियुक्तीला हिरवा कंदील दाखवला.

१९६८ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेले डोवाल हे राजनैतिक व दहशतवादविरोधी धोरणातील तज्ज्ञ आहेत. डोवाल हे राष्ट्रीय सुरक्षा, सैन्य व गुप्तचर यंत्रणांची जबाबदारी पाहणार आहेत. डोवाल यांना २० मे २०१४ मध्ये ‘राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार’ म्हणून नियुक्त केले गेले होते. माजी आयएएस अधिकारी पी. के. मिश्रा हे १० जून २०२४ पासून पुन्हा पंतप्रधानांचे प्रधान सचिव असतील. मिश्रा हे १९७२ चे आयपीएस अधिकारी आहेत. ते गेल्या १० वर्षांपासून पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत. मिश्रा हे प्रशासन व पंतप्रधान कार्यालयातील नियुक्तीचे काम पाहतील.

प्रत्येक बालकाला २२ नोव्हेंबरला पोलिओचे डोस; मुंबईत रविवारी पल्स पोलिओ मोहीम; २३ ते २७ नोव्हेंबरदरम्यान लसीकरण

Mumbai : तरुणीची छेड काढली, विरोध करताच दोघांना बेदम मारहाण; कुर्ल्यातील व्हायरल VIDEO प्रकरणी ८ अल्पवयीन ताब्यात

एनसीईआरटीतून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला; वंशजांची जनहित याचिका दाखल

Mumbai : पेप्सी उद्यानात छत्रपतींचा भव्य अश्वारुढ पुतळा; पालिका सभागृहाची मंजुरी

Mumbai : कामांच्या प्रस्तावांवरून गदारोळ; पारदर्शकतेचा अभाव, कंत्राटदारांना अभय; स्थायी समिती अध्यक्षांच्या पत्राकडे कानाडोळा