X
राजकीय

आकाश आनंद मायावती यांचे पुन्हा उत्तराधिकारी

बसपच्या नेत्या मायावती यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याबद्दल घेतलेला निर्णय बदलून पुन्हा एकदा आपला भाचा आकाश आनंद हेच आपला उत्तराधिकारी असल्याचे जाहीर केले.

Swapnil S

लखनऊ : बसपच्या नेत्या मायावती यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याबद्दल घेतलेला निर्णय बदलून पुन्हा एकदा आपला भाचा आकाश आनंद हेच आपला उत्तराधिकारी असल्याचे जाहीर केले. आकाश आनंद यांची पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान ७ मे रोजी मायावती यांनी आकाश आनंद हे अद्याप अपरिपक्व असल्याचे नमूद करून त्यांना पक्षातील पदांपासून दूर केले होते. बसपच्या राष्ट्रीय स्तरावरील बैठक रविवारी आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये आकाश आनंद यांच्याकडे पूर्वीच्या जबाबदाऱ्या सुपूर्द करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. आकाश आनंद हेच आता मायावती यांचे वारसदार असून ते पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक म्हणूनही काम पाहणार आहेत.

Mobile SIM Rules: आजपासून सिम कार्ड खरेदीचा नवा नियम लागू! एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतकेच' नंबर चालणार

साखरेची दर घसरण सुरू; सरकारच्या साठा मर्यादेचा परिणाम, साखर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष नाईकनवरे यांची माहिती

Mumbai : 'आम्ही शाळेतच गेलो नाही, मग मराठी कशी बोलणार?'; भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांचा ३ दिवसांचा संप

राज्यांनी PNG ला गती द्यावी; केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह, जिल्हास्तरीय अधिकारी नेमा

दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग