राजकीय

विधानसभेसाठी भाजपकडून निवडणूक प्रभारींची नियुक्ती; भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव महाराष्ट्राचे प्रभारी

महाराष्ट्रासह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या निवडणूक प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्रासह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या निवडणूक प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रासाठी निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, तर सहप्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

येत्या ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. त्यापाठोपाठ झारखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातल्या आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने भाजपने निवडणुकीच्या तयारीला वेग देण्यासाठी आपले प्रभारी नेमले आहेत.

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी भूपेंद्र यादव हे भाजपचे निवडणूक प्रभारी होते. आता पक्षाने पुन्हा यादव यांना नेमले आहे. तसेच त्यांच्या मदतीला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवडणूक सहप्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

हरयाणा, झारखंड, काश्मीरसाठीही प्रभारी जाहीर

दरम्यान, हरयाणासाठी निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, तर सहप्रभारी म्हणून खासदार विप्लव कुमार देव यांची नेमणूक करण्यात आली आहे. झारखंडसाठी प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान आणि सहप्रभारी म्हणून हिंमत सरमा यांच्याकडे सूत्रे देण्यात आली आहेत, तर जम्मू-काश्मीरचे निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक