राजकीय

काँग्रेसची उद्या बैठक; राहुल गांधी होणार विरोधी पक्षनेते?

Swapnil S

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस पक्षाने शनिवार, ८ जून रोजी काँग्रेस कार्यकारिणी समितीची (सीडब्ल्यूसी) बैठक बोलाविली आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या बैठकीचे आयोजन केले असून त्यांच्याच अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर पक्षाचे नेते चर्चा करणार आहेत. सकाळी ११ वाजता पक्षाच्या मुख्यालयात ही बैठक होणार आहे. या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी-वढेरा आणि पक्षाचे अन्य ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

राहुल गांधी होणार विरोधी पक्षनेते?

निवडणुकीत काँग्रेस पक्ष दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून विजयी झाला आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या होत्या, २०२४ मध्ये काँग्रेसला ९९ जागा मिळाल्या आहेत. जवळपास १० वर्षांच्या कालावधीनंतर काँग्रेस पक्षाला लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळणार आहे. त्यामुळे राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते बनण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त