राजकीय

शरद पवारांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले, "त्यांच्या बोलण्याचा अर्थ..."

अजित पवार आमचेच नेते असून काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली म्हणून पक्षात फूट पडली असं म्हणता येत नाही. लोकशाहीत तो त्यांचा अधिकार असल्याचं पवार म्हणाले होते.

नवशक्ती Web Desk

अजित पवार(Ajit pawar) यांनी बंडखोरी करत भाजपसोबत(BJP) सत्तेत सामील होण्याचा निर्यण घेतला. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad pawar) यांनी अजित पवार यांच्या गटाविरोधात दंड थोपटत पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी कसली. मात्र, आज(२५ ऑगस्ट) शरद पवार यांनी बारामतीत पत्राकरांशी बोलताना केलेल्या विधानामुळे सर्वत्र संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. अजित पवार हे आमचेच नेते आहेत. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली म्हणून पक्षात फूट पडली असं म्हणता येत नाही. लोकशाहीत तो त्यांचा अधिकार आहे, असं वक्तव्य शरद पवार यांनी केल्यानं सर्वत्र संभ्रम निर्माण झाला आहे. यावर काँग्रेस नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay VAdettiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांच्या बोलण्याचा अर्थ तेच सांगू शकतील. कदाचीत त्यांना पक्षाची काळजी असेल. न्यायालय आणि निवडणूक आयोगात प्रकरण सुरु असताना मीच पक्षाचा अध्यक्ष असून पक्षात कोणतीही फूट नाही, असं सांगण्याची त्यांची रणनिती असू शकते, आमचा त्यात खोल जाण्याच संबध येत नाहीत, असं वडेट्टीवर म्हणाले.

अजित पवारांनी काही आमदारांसोबत भाजपसोबत जात मंत्रीपदाची शपथ गेतली. तरी देखील सुप्रिया सुळे(Supriya sule) आणि शरद पवार यांनी पक्षात कोणतीही फूट पडली नसल्याचं सांगितलं. यामुळे ते पण भाजपसोबत जाण्याच्या मार्गावर आहेत का? असा प्रश्न वडेट्टीवार यांना विचारला गेला. यावर ते म्हणाले, "कोण कुठे जातो हे आता निवडणुकीतच कळणार आहेत. जनता उघड्या डोळ्यांनी सगळ बघते आहे. पैशाच्या बळावर लोकांना विकत घेऊ असं वाटत असेल, पण जनता यांना खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही. ते येणाऱ्या काळात दिसेल."

यावेळी बोलताना ते म्हणाले की, आम्हाला धोका वाटण्याचं काही कारण नाही. शरद पवारांप्रमाणे अनेक आघाड्या आहेत. या सगळ्यांचं एकच उत्तर आहे की, निवडणुकांची घोषणा होईल, आघाडीत वाटप होईल आणि त्यावेळी जे ठरेल ते त्यावेळची परिस्थिती असेल. स्वार्थासाठी आज अनेकजण बरबटले आहेत. विचारांचं, लोकांच्या मताचं काही देणंघेणं राहिलेलं नाही. लोकांना गृहित धरून खड्ड्यात घातल्याचं काम सुरु आहे. निवडणुकीतच काय ते चित्र स्पष्ट होईल, असं मत वडेट्टीवार यांनी मांडलं.

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले; चारही अंतराळवीरांसह कॅलिफोर्नियातील समुद्रात लँडिंग,भारतासाठी अभिमानाचा क्षण

आता मेट्रो गर्दीचे आव्हान

दिव्यांग कल्याण मंत्रालयालाच सहाय्याची गरज!

ग्रँड मुफ्तींच्या प्रयत्नांना यश; निमिषा प्रियाला मोठा दिलासा, येमेन सरकारकडून फाशी तुर्तास स्थगित

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल