राजकीय

अखेर नवाब मलिक यांचं ठरलं! ; कोणत्या गटात जाणार याबाबत भूमिका केली स्पष्ट

नवशक्ती Web Desk

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अनेक बडे नेते हे अजित पवार यांच्या छावणीत गेले आहेत. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणाने दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मिळाला आहे. यानंतर शरद पवार गटाकडून तसंच अजित पवार गटाकडून त्यांच्या भेटी गाठी घेणं सुरु आहे. यामुळे ते कोणत्या गटात जाणार याबाबत चर्चांना उधान आलं आहे. आता नवाब मलिक यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. टाईम्स ऑफ इंडियानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

गेल्या दीड वर्षापासून मनी लाँडरिंग प्रकरणात नवाब मलिक हे तुरुंगात होते. न्यायालयीन कोठडीत असतानाच त्यांच्यावर किडनीच्या आजारामुळं उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती ढासळल्याच्या कारणास्तव सुप्रीम कोर्टाने त्यांना दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला. मलिकांना मुंबईच्या सिटी केअर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला यावेळी सुप्रिया सुळे या अनेक तास रुग्णालयाबाहेर उपस्थित होत्या.

नवाब मलिकांचा जामीन मिळाल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार अशा दोन्ही गटाकडून त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली गेली. तसंच फोनवरुन तब्येतीची विचारपूस करण्यात केली. यानंतर नवाब मलिक कोणत्या गटात जातात या चर्चां जोर धरु लागल्या होत्या. तसंच याबाबत राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जात होता. मात्र, आता नवाब मलिक यांनीचं याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामुळे ते कोणत्या गटात जाणार या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना नवाब मलिक म्हणाले की, "मी कुठल्याही गटात जाणार नाही. मूळ राष्ट्रवादीसोबतच असणार आहे." यावेली नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक यांनी म्हटलं की, "माझ्या वडिलांसाठी सर्वात महत्वाचं काम त्यांच्या तब्येतीवर लक्ष केंद्रीत करणं असेल. आम्ही त्यांना उत्तम वैद्यकीय सुविधा पुरवू तसंच त्यांना पुन्हा कामासाठी तयार करु." यामुळे मलिक कोणत्या गटात जाणार या चर्चांना आता पुर्ण विराम मिळाला आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त