राजकीय

Nilesh Rane: मोठी बातमी! माजी खासदार निलेश राणे यांची सक्रिया राजकारणातून बाजूला होण्याची घोषणा

निलेश राणे यांनी अचानकपणे राजकारणातून बाजूला होण्याचा घेतलेला निर्णय हा सर्वांसाठी एक धक्का मानला जात आहे.

नवशक्ती Web Desk

आज सगळीकडे दसरा मेळाव्याची धूम सुरु असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांचे पुत्र भाजप नेते निलेश राणे यांनी राजकारणातून बाजूला होण्याची घोषणा केली आहे. निलेश राणे यांनी अचानकपणे राजकारणातून बाजूला होण्याचा घेतलेला निर्णय हा सर्वांसाठी एक धक्का मानला जात आहे. आपल्याला निवडणूक लढवण्यात कुठलाही रस नसून आपल मन रमत नसल्याची पोस्ट निलेश राणे यांनी 'एक्स' या सोशळमीडिया प्लॅटफॉर्मवर केली आहे. उगाच इतरांचा व स्वत:चा वेळ वाया घालवणं योग्य नसल्याचं देखील त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

माजी खासदार निलेश राणे यांनी आपण सक्रिय राजकारणातून बाजूला होत असल्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता राजकारणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षात आपण सगळ्यांनी खूप प्रेम दिलं. कारण, नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. बीजेपीतत खूप प्रेम भेटलं आणि बीजीपी सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी खूप नशिबवान आहे, असं राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले की, मी एक लहान माणूस आहे. पण राजकारणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करुन गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन, मला आता निवडणूक लढवण्यात वगैरे सर राहिला नाही. टीका करणारे टीका करतील. पण जिथे मनाला पटत नाहीत तिथे स्वत:चा आणि इतरांचा वेळ वाया घालवणं मला पटन नाही. कळत नकळत काही लोकांना दुखावलं असेल त्याबाद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असं देखील ते म्हणाले आहेत.

दरम्यान, माजी खासदार निलेश राणे यांनी घेतलेल्या निर्णयावर राणे कुटुंबीयांकडून तसंच राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या