राजकीय

'या ' पक्षाच्या नेत्याने दिली थेट नितीन गडकरींना पंतप्रधान पदाची ऑफर ; म्हणाले, "दिल्लीतील नतद्रष्ट..."

कॅगच्या अहवालाने गडकरींच्या खात्यवार ठपका ठेवल्याने उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत

नवशक्ती Web Desk

31 ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होत आहे. त्यापुर्वी इंडिया आघाडीतील एका घटकपक्षाने थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पंतप्रधान पदाची ऑफर दिली आहे. कॅगच्या अहवालाने गडकरींच्या खात्यवार ठपका ठेवल्याने उलट सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. यानंतर शिवसेनेना ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी नितीत गडकरींना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे.

विनायक राऊत काय म्हणाले?

कॅगच्या अहवालात नितीन गडकरी यांच्या खात्यावर ठपका ठेवण्यात आल्यानंतर चर्चांना उधान आलं होते. यावर खासदार विनायक राऊत यांनी नितीन गडकरी पंतप्रधान पदाचे दावेदार होतील म्हणून दिल्लीतील नतद्रष्ट लोकांनी त्यांना संपवण्याचा कट रचला आहे. महाराष्ट्र हा कट उधळून लावण्याचं काम करेल, असं म्हटंल आहे. गडकरींना विनंती आहे की, त्यांनी मराठी माणसाचं पाणी दिल्लीकरांना दाखवून द्याव.

याविषयी बोलताना विनायक राऊत पुढे म्हणाले की, नितीन गडकरी यांनी इंडिया आघाडीत याव. त्यांना आम्ही पंतप्रधान केल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरे सुद्धा असा शब्द देतील फक्त गडकरींनी दिल्लीकरांना घाबरू नये.

कॅगच्या अहवालावर गडकरींची प्रतिक्रिया

कॅगच्या अहवालात सांगितलेले मुद्दे योग्य नाहीत. द्वारका एस्प्रेसवे २९ किलोमीटर अंतराचा असल्याचा सांगण्यात आलंय. आम्ही पाठवलेली कॅबिनेट नोटमध्ये आम्ही पाच हजार किलोमीटरचा टू लेन रोज बनवू आणि त्याची किंमत ९१ हजार कोटी रुपये असेल असं सांगण्यात आलं आहे. यात फ्लायओव्हर आणि रिंगरोडी किंमत इस्टिमेटेड डीपीआर बनवल्यानंतर ठवण्याच निर्णय झाला होतास, असं गडकरी म्हणाले.

कॅग आपल्या अहवालात ज्याला २९ किलोमीटर म्हणत आहे मुळात तो २३० किमीचा एक्स्प्रेसवे आहे. यात ६ टनेल आणि ५६३ किमी एकूण लेनचा रोड आहे. टेंडर निघाला तो २०६ कोटी रुपये प्रतिकिलोमीटरसाठी होता त्यामुळे आम्ही या प्रोजेक्टवर १२ टक्के खर्च कमी केला आहे. असं देखील गडकरी यांनी स्पष्ट केलं.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश