राजकीय

"...त्यामुळे आम्ही एका फोटोवर थांबलो", बावनकुळेंच्या स्पष्टीकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

नवशक्ती Web Desk

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पर्यटनावर असताना त्यांचा कॅसिनोतील एक फोटो ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला होता. महाराष्ट्र जळत असताना राज्यातील नेता मकाऊमध्ये असल्याची एक्स पोस्ट राऊत यांनी केली होती. यात त्यांनी बावनकुळे यांनी जुगारात साडेतीन कोटी उडवल्याचा आरोप देखील केला होता. या पोस्टवरुन राज्यात प्रचंड राजकारण झाल्याचं पाहायला मिळालं. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं. भारतात परतल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत व्हायरल फोटोवर स्पष्टीकर दिलं.

बावनकुळेंचं स्पष्टीकरण

फोटोंच्या आधारावर कोणाची इमेज खराब करता येत नाही, असं मला वाटतं. आम्ही ३४ वर्षे काम करुन इमेज तयार केली आहे. त्यामुळे हा प्रयत्न केला असेल तर त्यांच्या प्रयत्न त्यांना लखलाभ पण यामुळे माझ्या परिवाराला त्रास झाला. माझ्या मुलीने आणि सुनेने माझ्याकडून तीन दिवसांचा वेळ घेऊन नियोजन केलं होतं. हाँगकांग या पर्यटनस्थळी गेलो. सगळं चांगलं चालू असताना व्यक्तिगत जीवनात आमच्या परिवाराला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न झाला. राजकारणात काम करत असताना असे प्रयत्न चुकीचे वाटतात. त्यामुळे मला आणि परिवाराला वाईट वाटलं, असं देखील बावनकुळे म्हणाले.

चंद्रशेखब बावनुकुळे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, बावनकुळे यांचं म्हणणं बरोबर आहे. हीच बाब त्यांनी त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांनी सांगावी. आमच्यात माणूसकी आहे. त्यामुळे आम्ही एकच फोटोवर थांबलो आहोत, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. त्यांनी हे त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांना सांगावं. ते राजकीय विरोधकांची ज्याप्रकारे प्रतिमा खराब करतात. त्या सगळ्या राजकीय लोकांनी ४०-४५ वर्षे राजकारण आणि समाजकारणात घालवली आहेत. तुम्ही आमच्या कुटुंबावर किंवा आमच्या नेत्यावर ज्या प्रकारे आरोप हल्ले करतात, हे कोणत्या संस्कृतीत बसतं, तीही विकृतीच आहे, असं राऊत म्हणाले.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, तुम्हाला आता कळलं असेल, काय हतं आमि काय घडतं. आमच्यात माणूसकी आहे. त्यामुळे आम्ही तिथेच थांबलो आहोत. मी परत सांगतो, आमच्यात संस्कती आणि माणूसकी आहे.. त्यामुळे आम्ही एका पोटोवर थांबलो आहोत. आमचं त्यांच्याशी(बावनकुळे) व्यक्तीगत भांडण नाही. पण भारतीय जनता पार्टी ज्या सैतानी पद्धतीने, निर्घुणपणे, विकृतपणे महाराष्ट्रातील आपल्या राजकीय विरोधकांवर चिखलफेक करते, खोटे गुन्हे दाखल करते, यंत्रणा वापरते, बदनामी करते, खोटे पुरावे उभे करते, ते चालतं का? बावनकुळेंनी त्यांच्या सहकाऱ्यांना समजावून सांगावं. मी परत सांगतो, आम्ही एका फोटोवर थांबलो आहोत, कारण आमच्यात माणुसकी आहे, असा इशाराचं राऊत यांनी दिला. ते नाशिक येथे माध्यमांशी बोलत होते.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या