राजकीय

झिरवळांच्या विधानावरुन संजय शिरसाट संतापले, अपेक्षेपेक्षा जास्त न बोलण्याचा दिला सल्ला

सर्व बाजूंचा विचार केला तर शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र होतील, असं विधान झिरवळ यांनी केलं होतं

नवशक्ती Web Desk

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे काही आमदारांच्या पाठिंब्याने शिंदे सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे निष्ठावान आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या नऊ जणांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली हा सध्या राज्याच चर्चेचा विषय आहे. असं असताना शिवसेनेच्या त्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा देखील चर्चेचा विषय आहे. सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयावर विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतली असा निकाल दिला होता. ठाकरे गटाकडून याबाबत लवकर निर्यय घेण्यात यावा यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे हा निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.

१६ आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णय तोंडावर असताना विधान सभेचे उपाध्यक्ष आणि अजित पवार यांच्यासह सरकारमध्ये सहभागी झालेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या त्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठ वक्तव्य केलं होतं. झिरवळ यांनी केलेलं वक्तव्य हे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांना न रुचल्याने त्यांनी नरहरी झिरवळ यांना खोचक सल्ला दिला आहे. "सर्व बाजुंचा विचार केला तर शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र होतील, पण याबाबतचा अंतिम अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा आहे. त्याबद्दल मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही", असं वक्तव्य झिरवळ यांनी केलं होतं.

त्यांच्या या वक्तव्यावर अपात्रतेची टांगती तलवार असणारे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. "नरहरी झिरवळांनी अपेक्षेपेक्षा जास्त बोलू नये. तुम्हाला तो अधिकार नाही, त्या अधिकारावर माणसानं बोलू नये", असं शिरसाट म्हणाले.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत