राजकीय

"...तर त्यांनी एड्स, कुष्ठरोगाचे सुख उपभोगावं", खासदार साध्वी प्रज्ञा यांचं खळबळजनक विधान

जो धर्माच्या, देशाच्या विरोधात बोलतो तो नायक असू शकत नाही. ज्याला आपण काय करतो हे माहिती नाही तो खलनायक असतोस असं देखील त्या म्हणाल्या.

नवशक्ती Web Desk

सनातन धर्मावरुन पुन्हा एकदा राजकारण तापताना दिसत आहे. मध्ये प्रदेशातील भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी याबाबत नवं वक्तव्य केल्याने हा वाद आणखी चव्हाट्यावर आला आहे. साध्वी प्रज्ञा यांनी सनातन धर्मावर टीका करणाऱ्यांना चांगलचं धारेवर धरलं आहे. यावेळी त्यांनी अभिनेता प्रकाश राज आणि तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर टीकेची झोड उठवली.

यावेळी त्यांनी सनातन धर्माची तुलना एड्स,कुष्टरोग आणि मलेशियाशी करणाऱ्यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ज्यांनी अशी टीका केली त्यांनाच या रोगाची लागण व्हावी. त्यांनीच या रोगांचा अपभोग घ्यावा, असं खळबळजनक वक्तव्य केलं आहे. खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर या आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी कायम चर्चेत असतात.

ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना अभिनेते प्रकाश राज यांच्यावर टीका करताना प्रकाश राज हे अभिनेते नाहीत, खलनायक आहेत. नायक नाहीत. जो धर्माच्या, देशाच्या विरोधात बोलतो तो नायक असू शकत नाही. ज्याला आपण काय करतो हे माहिती नाही तो खलनायक असतो. सनातन धर्माला नष्ट करण्याची औकात कोणामध्येही नाही, असं देखील त्यांनी म्हटलं.

डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन, डी राजा आणि प्रकाश राज यांना तोच रोग व्हावा, अशी प्रार्थना प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी देवाकडे केली आहे. यावेली त्या म्हणाल्या की, ज्यांनी सनातर धर्माला कुष्ठरोग म्हटलं, त्यांनी कुष्ठरोगाचे सुख भोगावं. ज्यांनी सनातन धर्माला एड्स म्हटलय त्याने एड्सचे सुख भोगावं. उदयनिधी यांनी सनातन धर्मावर केलेल्या टीकेनंतर भाजपच्या सर्व नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, मुंबई पोलीस ठाम ; भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश