राजकीय

"मूठभर का असेना पण निष्ठावान अशीच माणसं मला हवीत", उद्धव ठाकरेंचा शिंदे गटासह भाजवर निशाणा

खासदार संजय राऊत यांनी 'आवाज कुणाचा' पॉडकास्टमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं आहे.

नवशक्ती Web Desk

'सामना' है दैनिकाचे कार्यकारी संपादक आणि ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी 'आवाज कुणाचा' पॉडकास्टमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा पहिला भाग आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास प्रसारित झाला. तर दुसरा भाग हा उद्या (२७ जुलै) सकाळी ८ वाजता प्रसारित होणार आहे. यामुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यार सडकून टीका केली. इर्शाळवाडीतील घटनेच्या दुसऱ्याचं दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत मुजरा करायला गेले,अशी टीका ठाकरे यांनी केली.

यावेळी त्यांनी मणिपूरमध्ये सुरु असले्लया हिंसाचार, गोवंश हत्याबंदी आणि समान नागरी कायद्याच्या मुद्यावरुन पंतप्रधान मोदींचा धारेवर धरलं. तसंच २०२४ साली हे सरकार सत्तेत आलं तर देशात लोकशाही राहणार नाही, त्यानंतर निवडणूका होतील असं मला वाटत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयोगाचं काम हे निवडणूक निशाणी किंवा चिन्हं देण्याचं आहे. पक्षाचं नाव देण्याचं किंवा बदलण्याचं नाही. म्हणून आयोगाने दिलेल्या विचित्र निकालाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात गेलोय. त्यामुळे शिवसेना हे नाव मला पुन्हा मिळेल अशी खात्री आहे. असही उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी त्यांनी पंतप्रधानांनी बोलवलेल्या एनडीएच्या बैठकीवर टीका केली. बऱ्यांच वर्षांनंतर या देशातील एनडीए नावाचा अमिबा जिवंत आहे हे कळलं. एनडीएमध्ये फत्त ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत आहेत. अशी बोचरी टीका देखील त्यांनी केली. तसंच या मुलाखतीत त्यांनी बंडखोर आमदारांवर देखील निशाणा साधला. मनाने विकली गेलेली मानसे मला नकोच आहेत. मूठभर का असेना पण निष्ठावान अशीच माणसं मला हवीत. कारण तीच खरी शक्ती असते. पसाभर गद्दार घेऊन फिरण्यापेक्षा मूठभर निष्ठावान मला नेहमीच आवडतात, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव