राजकीय

Vasundhara raje: वसुंधरा राजेंनी गुलाल उधळला! झालरापाटनमधून मिळवला 'एवढ्या' मतांनी विजय

सध्या राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्ष ११४ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसची मोठी पिछाडी झाली असून काँग्रेस ७० जागांवर आघाडीवर आहे.

नवशक्ती Web Desk

देशातील चार राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरु असुन तीन छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राज्यस्थान या राज्यात भाजपने काँग्रेसला पिछाडीवर टाकलं आहे. सध्या राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्ष ११४ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसची मोठी पिछाडी झाली असून काँग्रेस ७० जागांवर आघाडीवर आहे. BSP १ तर इतर उमेदवार १३ जागांवर आघाडीवर आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या संभाव्य उमेदवार आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे तब्बल मतांनी विजयी झाल्या आहेत. वसुंधरा राजे या २००३ सालपासून झालरापाटन मतदारसंघातून विजयी होत आहेत.

दरम्यान, राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी मतमोजणी केंद्रावर सुरळीतपण व्यवस्था करण्यात आली होती. आज सकाळी ८ वाजेपासून सर्व मतदान केंद्रांवर मतपत्रिकांची मत मोजणी सुरु झाली होती.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक