राजकीय

"त्यांना असा नेमका कोणता हृदयविकाराचा झटका आला?" गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना खोचक टोला

नवशक्ती Web Desk

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. असं असताना आता राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेतल्यास राज्यातील सगळे प्रश्‍न आपोआप सुटतील, असा टोला ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे.

गिरीश महाजन म्हणाले की,त श्री. एकनाथ खडसे यांना गौण खनिज प्रकरणी १३७ कोटींची नोटीस आल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि ‘एअर ॲम्बुलन्स'ने मुंबई येथील रुग्णालयात ते ताबोडतोब उपचारासाठी दाखल झाले. त्यांना असा नेमका कोणता हृदयविकाराचा झटका आला? खोटी सोंगं नुसती करायची. उपचार घ्यायचे आणि परत इकडे येऊन आरोप करायचे. याला काय म्हणावे आता? त्यापेक्षा श्री. खडसे यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी.

शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, राज्यात सरकार जे शेतकऱ्‍यांचे प्रश्‍न आहेत ते सोडवण्यासाठी समर्थ आहे. रघुनाथदादांचे आता वय झाले आहे. त्यामुळे त्यांनी काय बोलावं हे त्यांनी ठरवावं. रघुनाथदादा हे आता ज्येष्ठ आहेत त्यांनी अशा प्रकारची विधाने मांडू नये. कापसाला सद्यःस्थितीत आठ हजार रुपयांपर्यंत भाव आहे. यंदा उत्पादन कमी असल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील परिस्थितीमुळे त्याचा परिणाम जाणवत आहे. असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस