राजकीय

ठाकरे गट आता काय करणार? अंबादास दानवे यांना 'हा' धोका

ठाकरे गटातील विधान परिषदेच्या आमदारांची संख्या आता कमी होऊन ९ वर झाली आहे

नवशक्ती Web Desk

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला लागलेली गळती काही केल्या कमी व्हायचं नाव घेताना दिसत नाही. ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी रविवारी रात्री शिंदेगटात प्रवेश केला. ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. वर्षभरात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात होत असलेले बदल आणि त्यांच्या कामाची गती पाहूनच आपण शिंदे यांच्या ओरिजनल शिवसेनेत प्रवेश केल्याचं मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे. केवळ दोषारोप करणे तसंच लोक पक्ष सोडून का जात आहेत याचे आत्मपरिक्षण करणे, अशी अनेक कारणं असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. भविष्यात अनेक जण इकडे (शिंदे गटात)
येतील, कारण त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. अजून अनेक महिलांचे ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश होतील असं त्यांनी सांगितलं आहे.

मनीषा कायंदे यांच्या शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्याने ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद धोक्यात येण्याची शक्यता आहे. कायंदे या शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटाच्या जागा कमी झाल्या आहेत. ठाकरे गटातील विधान परिषदेच्या आमदारांची संख्या आता कमी होऊन ९ वर झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या देखील ९ झाली आहे. अंबादास दानवे हे सध्या शिवसेना ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेच्या विरोधी पक्षेनेते पदावर दावा केल्यास दानवे याचं पद जाण्याची शक्यता आहे, अशी सध्या चर्चा सुरु आहे.

सद्या विधान सभेच्या एकून जागांपैकी भारतीय जनता पार्टीकडे २२ जागा आहे. ठाकरे गटाकडे ९ जागा आहे. तर शिंदे यांच्याकडे २ जागा विधानपरिषदेच्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे देखील विधान परिषदेत ९ जागांच संख्याबळ आहे. काँग्रेसकडे ८ तर इतर अपक्षांकडे एकून ७ जागा आहे. विधानपरिषेद्या एकूण २२ जागा सध्या रिक्त आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना
ठाकरे गटाकडे समान ९ जागा असल्याचे ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद जाईल अशी चर्चा सुरु आहे.

BMC Election : आज मतदान; मुंबईच केंद्रस्थानी; बोटावर उमटणार लोकशाहीचा ठसा, तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण

मतदानानंतर लगेच पुसली जाते बोटावरची शाई; मनसेच्या महिला उमेदवाराचा दावा; काँग्रेसच्या सचिन सावंतांनी तर प्रात्यक्षिकच दाखवलं - Video

BMC Elections 2026: 'व्होटर स्लिप्स'चा गोंधळ; अनेक मतदार मतदान न करताच परतले

Thane Election : व्होटर स्लिपमध्ये घोळ; नाव, अनुक्रमांक बरोबर; पत्ते मात्र बदलले

BMC Elections 2026: मुंबईत मतदानाला झाली सुरूवात; आज काय सुरू, काय बंद?