क्रीडा

१५ वर्षीय लिंथोई ठरली सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ज्युडोपटू

वृत्तसंस्था

मणिपूरच्या ज्युडोपटू लिंथोई चनाम्बमने जागतिक ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये १८ वर्षांखालील मुलींच्या ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले.

१५ वर्षीय लिंथोईने अंतिम फेरीत ब्राझीलच्या बियान्का रीसचा पराभव केला. कोणत्याही वयोगटातील जागतिक ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ज्युडोपटू ठरली. लिंथोईने शेवटच्या सेकंदात १-० असा विजय मिळविला.

या महिन्यात बर्मिंगहॅम येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही भारतीय ज्युडोपटूनी चमकदार कामगिरी केली होती. तिथे ज्युडोमध्ये भारताने तीन पदके जिंकली होती. यामध्ये दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाचा समावेश आहे.

२०१७ मध्ये जिंकले होते राष्ट्रीय सुवर्णपदक

लिंथोई ही ऑलिम्पिक लक्ष्य पोडियम योजनेची एक भाग आहे. बेरूत (लेबनॉन) येथे झालेल्या आशिया-ओशियाना कॅडेट ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये तिने कांस्यपदक जिंकले होते.

२०२२च्या आशियाई कॅडेट आणि ज्युनिअर ज्युडो चॅम्पियनशिपमध्येही तिने सुवर्णपदक पटकाविले. लिंथोईने २०१७ मध्ये सब-ज्युनिअर नॅशनल आणि २०२१ मध्ये राष्ट्रीय कॅडेट ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येकी एक सुवर्णपदक मिळविले होते.

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम

थांबा... पुढे धोका, आज समुद्र खवळणार; हवामान विभागाचा 'अलर्ट'; समुद्रात जाणे टाळा, पालिकेचे आवाहन

भारतीय नौदल बांधणार ‘एआयपी’ तंत्रज्ञानाने पाणबुड्या; ६० हजार कोटींचा प्रकल्प!

IPL 2024: चेन्नईची प्ले-ऑफसाठी झुंज,बेभरवशी पंजाब किंग्जविरुद्ध आज लढत!

एच. डी. रेवण्णा एसआयटीच्या ताब्यात,राहुल गांधी यांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र!