एक्स @Saabir_Saabu01
क्रीडा

हरलीनच्या शतकामुळे विजयी आघाडी; भारतीय महिला संघाचे दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजवर ११५ धावांनी वर्चस्व

२६ वर्षीय प्रतिभावान फलंदाज हरलीन देओलने मंगळवारी कारकीर्दीतील पहिले शतक झळकावताना १०३ चेंडूंत ११५ धावा फटकावल्या.

Swapnil S

वडोदरा : २६ वर्षीय प्रतिभावान फलंदाज हरलीन देओलने मंगळवारी कारकीर्दीतील पहिले शतक झळकावताना १०३ चेंडूंत ११५ धावा फटकावल्या. त्यामुळे भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिजचा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ११५ धावांनी फडशा पाडला. याबरोबरच भारताने ३ लढतींच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

कोटांबी स्टेडियम, वडोदरा येथे झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ५ बाद ३५८ धावांचा डोंगर उभारला. भारताने दुसऱ्यांदा एकदिवसीय सामन्यात इतकी धावसंख्या रचली. यापूर्वी २०१७मध्ये आयर्लंडविरुद्ध भारताने २ बाद ३५८ धावा फटकावल्या होत्या. मंगळवारी भारताकडून स्मृती मानधना (५३) व प्रतिका रावल (७६) यांनी दमदार सुरुवात केली.

या दोघींनी ९९ चेंडूंत ११० धावांची सलामी नोंदवली. स्मृतीने सलग सहाव्या आंतरराष्ट्रीय सामन्यांत ५० धावांचा टप्पा गाठला. तिने ७ चौकार व २ षटकारांसह २९वे एकदिवसीय अर्धशतक साकारले. तर कारकीर्दीतील दुसरीच लढत खेळणाऱ्या प्रतिकाने १० चौकार व १ षटकारासह पहिले अर्धशतक झळकावले. स्मृती धावचीत झाल्यावर मैदानात आलेल्या हरलीनने आक्रमण सुरूच ठेवले.

तिने १६ चौकारांसह कारकीर्दीतील पहिल्या शतकाला गवसणी घातली. हरलीनने दुसऱ्या विकेटसाठी प्रतिकासह ६२ धावांची, तर कर्णधार हरमनप्रीत कौरसह तिसऱ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी रचली. हरमनप्रीत २२, तर प्रतिका ७६ धावांवर बाद झाली. मात्र हरलीनने जेमिमा रॉड्रिग्जच्या साथीने प्रहार कायम राखला. हरलीन ४८व्या षटकात बाद झाली. मुंबईकर जेमिमाने मात्र ३६ चेंडूंतच ५२ धावा फटकावल्या. त्यामुळे भारताने साडेतीनशे धावांचा पल्ला गाठला.

लक्ष्याचा पाठलाग करताना फिरकीपटू प्रिया मिश्राने ३ बळी मिळवून विंडीजला रोखले. त्यांचा संघ ४६.२ षटकांत २४३ धावांत गारद झाला. कर्णधार हीली मॅथ्यूजने विंडीजकडून शतकी झुंज देताना १३ चौकारांसह १०९ चेंडूंत १०६ धावा केल्या. मात्र शीमेन कॅम्पबेल (३८) वगळता अन्य कुणीही फलंदाज तिला फारशी साथ देऊ शकले नाहीत. प्रतिकाने मॅथ्यूजचा अडसर दूर करून भारताचा विजय पक्का केला. दीप्ती शर्मा, प्रतिका व तितास साधू यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. हरलीन सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली. शुक्रवारी तिसरी लढत खेळवण्यात येईल.

संक्षिप्त धावफलक

भारत : ५० षटकांत ५ बाद ३५८ (हरलीन देओल ११५, प्रतिका रावल ७६, स्मृती मानधना ५३; क्विना जोसेफ १/२७) विजयी वि. वेस्ट इंडिज : ४६.२ षटकांत सर्व बाद २४३ (हीली मॅथ्यूज १०६, शीमेन कॅम्पबेल ३८; प्रिया मिश्रा ३/४९)

सामनावीर : हरलीन देओल

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल