क्रीडा

अक्षय, संपदा यांच्याकडे महाराष्ट्राच्या संघांचे नेतृत्व; दिल्लीत उद्यापासून रंगणार पुरुष-महिलांची राष्ट्रीय खो-खो स्पर्धा

Swapnil S

मुंबई : भारतीय खो खो महासंघाच्या वतीने दिल्ली येथे २८ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत ५६व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस ॲड. गोविंद शर्मा यांनी महाराष्ट्राचे संघ जाहीर केले आहेत. या स्पर्धेत सांगलीचा अक्षय मासाळ आणि धाराशीवची संपदा मोरे अनुक्रमे महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघाचे नेतृत्व करणार आहे.

गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या पुरुषांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर महिलांनी मात्र विजेतेपद मिळवले होते. त्यामुळे यंदा पुरुषांचा संघ भारतीय रेल्वेच्या संघाला कडवी झुंज देईल, असे अपेक्षित आहे. महाराष्ट्राच्या महिलांना भारतीय विमानतळ प्राधिकरण (एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया) या संघाकडून आव्हान मिळेल. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचे १९ मार्चपासून परभणी येथील केकेएम महाविद्यालयाच्या क्रीडांगणात सराव शिबीर झाले. या शिबिराच्या अखेरीस दोन्ही कर्णधारांची घोषणा करण्यात आली.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ

  • पुरुष : अक्षय मासाळ (कर्णधार), प्रतीक वाईकर, सुयश गरगटे, राहुल मंडल, वृषभ वाघ, आदित्य गणपुले, अनिकेत चेंदवणकर, ऋषिकेश मुर्चावडे, निखिल सोडीये, अक्षय भांगरे, दिलीप खांडवी, लक्ष्मण गवस, सौरभ घाडगे, विजय शिंदे, शुभम जाधव. राखीव : वेदांत देसाई, गजानन शेंगाळ, सुरज लांडे. प्रशिक्षक : शिरीन गोडबोले (पुणे)

  • महिला : संपदा मोरे (कर्णधार), प्रियांका इंगळे, काजल भोर, स्नेहल जाधव, कोमल दारवटकर, ऋतिका राठोड, रेश्मा राठोड, पूजा फरगडे, किशोरी मोकाशी, गौरी शिंदे, संपदा मोरे, ऋतुजा खरे, अश्विनी शिंदे, पायल पवार, सानिका चाफे, मिताली बारसकर. राखीव : अपेक्षा सुतार, प्रतीक्षा बिराजदार, निशा वैजाल. प्रशिक्षक : प्रवीण बागल (धाराशीव)

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? शरद पवारांनी वर्तवला अंदाज

पाच वर्षाच्या मुलामुळे बंद होणार दारूची दुकाने, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

EVM की खेळणं! BJP नेत्याच्या लहान मुलानं केलं मतदान; नेत्यावर गुन्हा दाखल, अधिकारी निलंबित

Nagpur Shocker : शाळेतून घरी सोडणाऱ्या रिक्षाचालकाने केला १० वीच्या मुलीचा विनयभंग; Video व्हायरल झाल्यावर घटना उघडकीस

मुंबईचा आवाज संसदेत 'असा' घुमणार,नवशक्तिच्या परिसंवादात उमटले मुंबईकरांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब!